इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:मिरवट येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने प्लास्टिक मुक्त अभियान

मिरवट येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने प्लास्टिक मुक्त अभियान 




परळी (प्रतिनिधी) :- मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष शिबिर मौजे मिरवट येथे सुरू झाले असून रासेयोच्या स्वयंसेवकांनी दि.२७ जानेवारी रोजी मिरवट गावात स्वच्छता अभियान राबवले. 

              थर्मल कॉलनी येथील न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विशेष शिबिराचे आयोजन तालुक्यातील मौजे मिरवट येथे करण्यात आले आहे. दि.२४ जानेवारी ते दि.३० जानेवारी रोजी दरम्यान विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. दि.२७ जानेवारी रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मौजे मिरवट गावात प्लास्टिक मुक्ती अभियान राबवत गावाची स्वच्छता केली. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सदरील उपक्रम प्राचार्य एन.एच. शेंडगे, उपप्राचार्य सुनील लोमटे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.अंकुश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या