पोस्ट्स

MB NEWS-सिरसाळ्यात ट्रक चोरी तर परळीत घरफोडीची घटना

इमेज
  सिरसाळ्यात ट्रक चोरी तर परळीत घरफोडीची घटना परळी वैजनाथ ,प्रतिनिधी...  परळी शहर व तालुक्यात चोरीचे सत्र अखंडितपणाने सुरूच आहे. दररोज कुठे ना कुठे चोरीच्या घटनांची नोंद पोलीस ठाण्यात होत आहे. वाढत्या चोऱ्या हा नागरिकांच्या चिंतेचा विषय बनलेला आहे. सिरसाळा येथे ट्रकचोरीची तर परळी शहरात घरफोडीची घटना नोंद झाली आहे.        याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, सिरसाळा जवळील एका पेट्रोल पंपा समोर लावलेली फिर्यादी वाजेखान सादत खान पठाण या वीट भट्टी व्यवसायिकाची लाल भगव्या रंगाची जुनी वापरती ट्रक कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.या ट्रकची अंदाजे किंमत दोन लाख वीस हजार आहे .याप्रकरणी सिरसाळा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोह शेंगळे हे करत आहेत. तर दुसरी घटना परळी शहरात घडली असून फिर्यादी शांताबाई केशवराव वाघमारे राहणार हबीबपुरा यांच्या घरात अज्ञात चोरट्याने दाराची कडी व कुलूप तोडण्याचा प्रयत्न करून घराचे पत्रे उचकवून आत प्रवेश केला व घरातील सोन्याचे लॉकेट कानातील झुंबर जोड नगदी असा एकूण 73 रुपयाचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्र

MB NEWS-माजलगाव धरणातील बेपत्ता डाॕ.दत्ता फपाळ यांचा मृतदेह सापडला

इमेज
  माजलगाव धरणातील बेपत्ता डाॕ.दत्ता फपाळ यांचा मृतदेह सापडला धारूर तालुक्यातील तेलगाव येथील डॉ फपाळ हे माजलगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेले असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजे दरम्यान घडली.         धारूर तालुक्यातील तेलगाव येथे रुग्णसेवा देणारे डॉ. दत्ता फपाळ वय 40 वर्ष (रा.बेलुरा ता.माजलगांव)मयत डॉक्टरचे नाव असून ते सकाळी मित्रांसमवेत माजलगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान तळ्यात पाणी जास्त असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. काल सकाळपासून विविध शोध पथका मार्फत त्यांच्या मृतदेहाचा शोध घेतला जात होता यादरम्यान शोध घेणाऱ्या पथकातील एका जवानाचाही मृत्यू झालेला आहे आज सायंकाळी 5:45 च्या दरम्यान शोधपथकाला डॉक्टर कपाळ यांचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे.      स्थानिक मच्छीमारांचे शोधमोहीमेत मोठे योगदान  माजलगाव धरणावर दररोज मिञा सोबत पोहण्यासाठी जात आसालेल्या डाॕ.दत्ता फपाळ हे रविवारी धरणावर पोहण्यासाठी गेले आसताना.धरणाच्या पाञात लांब गेल्याने तीथुन परत येण्याच्या आत त्यांना दम लागल्याने ते घाबरुन पाण्यात बुडाले त्यांचा मृतदेह सापडण्यासाठी बीड , परळ

MB NEWS-माजलगाव धरणात बुडालेल्या शोध पथकातील जवानाचा बुडून मृत्यू;मृतदेह सापडला

इमेज
   माजलगाव धरणात बुडालेल्या शोध पथकातील जवानाचा बुडून मृत्यू;मृतदेह सापडला माजलगाव............     माजलगाव येथील धरणात बुडालेल्या डाॕ.फपाळ यांना शोधण्यासाठी कोल्हापुर येथील जवान ही  पाण्यात बेपत्ता झाला होता. एनडीआरएफ च्या या जवानाचा तळ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला असून शोध पथकाने सर्च ऑपरेशन करून हे दोन्ही मतादेह शोधण्याचा प्रयत्न केला असता या जवानाचा मृतदेह  सापडला आहे. बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे स्वतः घटनास्थळी तळ ठोकून आहेत.          धारूर तालुक्यातील तेलगाव येथील डॉ फपाळ हे माजलगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेले असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजे दरम्यान घडली. संबंधित बातमी : माजलगाव धरणात डॉक्टर बुडाला धारूर तालुक्यातील तेलगाव येथे रुग्णसेवा देणारे डॉ. दत्ता फपाळ वय 40 वर्ष (रा.बेलुरा ता.माजलगांव)मयत डॉक्टरचे नाव असून ते सकाळी मित्रांसमवेत माजलगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान तळ्यात पाणी जास्त असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. पाणि जास्त प्रमाणात असल्याने प्रेत अद्याप सापडलेले नाही.    डॉ. फपाळ यांचा मृतद

MB NEWS-धरणात बुडालेल्या डॉक्टरांचा शोध घेणाऱ्या पथकातील जवान पाण्यात बेपत्ता

इमेज
  धक्कादायक: माजलगाव धरणात बुडालेल्या डॉक्टरांचा शोध घेणाऱ्या पथकातील जवान पाण्यात बेपत्ता     माजलगाव येथील धरणात बुडालेल्या डाॕ.फपाळ यांना शोधण्यासाठी कोल्हापुर येथील जवान ही यात पाण्यात बेपत्ता झाला आहे.         धारूर तालुक्यातील तेलगाव येथील डॉ फपाळ हे माजलगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेले असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजे दरम्यान घडली. संबंधित बातमी : माजलगाव धरणात डॉक्टर बुडाला धारूर तालुक्यातील तेलगाव येथे रुग्णसेवा देणारे डॉ. दत्ता फपाळ वय 40 वर्ष (रा.बेलुरा ता.माजलगांव)मयत डॉक्टरचे नाव असून ते सकाळी मित्रांसमवेत माजलगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान तळ्यात पाणी जास्त असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. पाणि जास्त प्रमाणात असल्याने प्रेत अद्याप सापडलेले नाही.    डॉ. फपाळ यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी बीड, परळी, येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करीत होते. आज त्यांच्या मदतीला कोल्हापूर येथील एनडीआरएफची टीम धावून आली. या टिमने शोधकार्य सुरू केले. मात्र धरणात मच्छिमारांनी लावलेल्या जाळ्यात अडकून टीममधील

MB NEWS-लावण्याई पब्लिक स्कूल मध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा

इमेज
 * इंग्रजी माधयामातुन शिका पण भारतीय संस्कृती जपा- डाॅ सुरेश चौधरी भविष्यात  हीच मुले  शाळेचे  नाव उज्ज्वल  करतील-प्रा. डाॅ.  जगतकर   लावण्याई  पब्लिक स्कूल मध्ये  मराठवाडा  मुक्ती  संग्राम  दिन  उत्साहात  साजरा परळी वैजनाथ  (प्रतिनिधी )  17 सप्टेंबर या मराठवाडा  मुक्ती  संग्राम  दिन  लावण्याई पब्लिक स्कूल  मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बोलतांना डाॅ चौधरी   म्हणाले  की, मुलांना ईंग्रजी माध्यमातुन  शिकवा पण हे शिक्षण घेत असतांना आपली भारतीय संस्कृती जपली पाहिजे असे मत या वेळी बोलतांना व्यक्त केले तर प्रा. डाॅ  विनोद  जगतकर यांनी मोलाचे मार्गदर्शन करून  लावण्याई  पब्लिक  स्कुल  मधील  मुले  भविष्यात  मोठे  होवुन  शाळेचे  नाव उज्वल  करतील असा विश्वास असल्याचे प्रा डॉ  जगतकर  यांनी बोलताना व्यक्त  केले         लावण्याई पब्लिक स्कूल मध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डाॅ  सुरेशचंद्र चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमात लक्ष्मीबाई देशमुख  महिला  महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख  प्रा.  डाॅ  विनोद  जगतकर, माज

MB NEWS-पोहण्यासाठी गेलेल्या डॉक्टरचा तळ्यात बुडून मृत्यू

इमेज
  पोहण्यासाठी गेलेल्या डॉक्टरचा तळ्यात बुडून मृत्यू धारूर..... धारूर तालुक्यातील तेलगाव येथील डॉ फपाळ हे माजलगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेले असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजे दरम्यान घडली. धारूर तालुक्यातील तेलगाव येथे रुग्णसेवा देणारे डॉ. दत्ता फपाळ वय 40 वर्ष (रा.बेलुरा ता.माजलगांव)मयत डॉक्टरचे नाव असून ते सकाळी मित्रांसमवेत माजलगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान तळ्यात पाणी जास्त असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. पाणि जास्त प्रमाणात असल्याने प्रेत सापडत नसुन बीड येथील पथक घटनास्थळी येत असल्याची माहिती आहे. डॉ. फपाळ हे यांचा तेलगाव येथे दवाखाना असून तेलगाव परिसरात सुप्रसिद्ध असलेल्या डॉक्टरचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

MB NEWS- दुहेरी संकट: शेतकरी चिंताग्रस्त

इमेज
  भाव वाढण्याची वाट बघणार्‍या शेतकऱ्यांच्या घरातच सोयाबीनला  लागल्या अळ्या ; शेतकरी हवालदिल   परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         गेल्या वर्षीचे सोयाबीन मोठ्या प्रमाणावर साठा झालेले आहे. आज ना उद्या भाव मिळेल या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी अडचणींचा सामना करत या सोयाबीनची साठवणूक करून ठेवली मात्र यावर्षीचे सोयाबीन निघण्याची वेळ आली तरी सोयाबीनला अपेक्षित भाव काही आला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल बनला असून आता शेतकऱ्यांच्या घरी असलेले सोयाबीन जागेवरच वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणावर साठा असलेल्या सोयाबीनला जागेवरच अळ्या लावायला सुरुवात झाली आहे.त्यामुळे कवडीमोल भावाने सोयाबीन विकण्याशिवाय आता शेतकऱ्यांसमोर पर्याय उरलेला नाही.          गेल्या वर्षी सुरुवातीला सोयाबीनला चांगला भाव होता. त्यानंतर सोयाबीनचे भाव घसरले. गेल्या सहा महिन्यापासून सोयाबीनचे भाव घसरलेलेच राहिले. बाजारपेठेत सोयाबीनला उठाव नसल्याने सोयाबीनच्या किमती वाढल्या नाही. आज ना उद्या अपेक्षित भाव वाढेल याची वाट बघणारा शेतकरी आता मात्र हातचेही गेले आणि पदरचेही गेले अशा अवस्थेत सापडला आहे. कारण घरात साठवून ठेवले

MB NEWS- *■मराठवाडा मुक्ती संग्रामाचा पाठय पुस्तकात समावेश व्हावा-डॉ.विवेक मॉंटोरो*

इमेज
 ■मराठवाडा मुक्ती संग्रामाचा पाठय पुस्तकात समावेश व्हावा-डॉ.विवेक मॉंटोरो परळी / प्रतिनिधी देशाच्या स्वतंत्र संग्रामाप्रमाणे मराठवाडा मुक्ती संग्राम इतिहास आहे.निजामशाहीच्या जुलमी राजवटीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी मराठवाड्यात अनेकांनी आपल्या जीवाची आहुती देत शहीद झाले.मराठवाडा मुक्ती संग्राम इतिहास भावी पिढीला कळवा,त्यातून प्रेरणा मिळावी याकरिता मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास पाठय पुस्तकात असावा असे मत संशोधन,गणितज्ञ डॉ.विवेक मॉंटोरो यांनी व्यक्त केले. परळी तालुक्यातील महाराष्ट्र प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मोहा येथे 74 व्या मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.या प्रसंगी पुणे येथील नवनिर्मिती फौंडेशनच्या संचालिका गीता महाशब्दे, स्वाती मोरे,संस्थेचे सचिव एड.अजय बुरांडे,जेष्ठ संचालक सुदामदादा देशमुख, सुदाम शिंदे,सखाराम शिंदे आदी उपस्थित होते.या प्रसंगी डॉ.विवेक मॉंटोरो यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न झाले. अमेरिका येथील जागतिक ख्यातीचे स्टोनी ब्रूक या विद्यापीठातून गणितीय भौतिकशास्त्र या विषयात पीएचडी करू

MB NEWS-भेल सेकंडरी स्कूल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि " निधी समर्पणाचा कार्यक्रम

इमेज
  भेल सेकंडरी स्कूल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि " निधी समर्पणाचा कार्यक्रम  परळी.वै:    येथील बीड जिल्ह्य़ातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचलित एकमेवाद्वितीय भेल संकुलात " मराठवाडा मुक्ति संग्राम दिन" मा.श्री.राम पोरवालजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करूण साजरा करण्यात आला. मराठवाडा मुक्ति संग्राम हे हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढ्यातील एक उज्ज्वल व लोक विलक्षण पर्व आहे.मराठवाड्याच्या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या ज्ञात- अज्ञात हुतात्म्यांना व त्यांच्या अतुलनीय शौर्याची स्मृती सदैव जागृत ठेवण्यासाठीच हा दिन साजरा केला जातो.या दिनाचे औचित्य साधून इ.स 2021-22 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीतील ( स्टेट व सी.बी.एस.ई पॅटर्न) मधील विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसोबत यथोचित सत्कार मान्यवरांकडून करण्यात आला. तसेच दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्व. अजित विकासराव डुबे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मा.श्री.विकासराव डुबे यांनी भेल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी  विविध विषयांवरील प

MB NEWS-पंतप्रधान मोंदींच्या वाढदिवसानिमित्त पंकजाताई मुंडे यांचा स्त्युत्य संकल्प*

इमेज
 * टीबी रूग्णांच्या सेवेसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान सरसावले!* *दोन रूग्ण दत्तक घेऊन उपचाराची संपूर्ण काळजी घेणार*  *पंतप्रधान मोंदींच्या वाढदिवसानिमित्त पंकजाताई मुंडे यांचा स्त्युत्य संकल्प* परळी ।दिनांक १७।  समाजातील वंचित, पिडित व गरजू लोकांना नेहमीच मदतीचा हात देणाऱ्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने आता टीबी रूग्णांच्या सेवेसाठी पुढाकार घेतला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी टीबीचे दोन रूग्ण दत्तक घेऊन त्याच्या उपचाराची संपूर्ण काळजी घेणार असल्याचा स्त्युत्य संकल्प   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर केला आहे.    यासंदर्भात पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की,सेवा पंधरवाडाच्या निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या जन्म दिवस १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहेत. हे कार्यक्रम अत्यंत साधेपणाने व्हावेत अशी अपेक्षा आहे. आज आदरणीय मोदीजीनां वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा देत असताना त्यांनी जो मार्ग आम्हाला दिला आहे

MB NEWS- मुख्यमंत्री काही मिनिटात ध्वजारोहण उरकून हैदराबादला गेलेच कसे? -अजित पवारांचा निशाना

इमेज
  मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन: सरकारकडून झालेली बेफिकिरी दुर्दैवी -अजित पवार मुख्यमंत्री काही मिनिटात ध्वजारोहण उरकून हैदराबादला गेलेच कसे? -अजित पवारांचा निशाना बीड दि. 17 - महाराष्ट्रात मराठवाडा मुक्ति संग्राम दिनाचे कार्यक्रम घ्यायचे सोडून मुख्यमंत्री काही मिनिटात ध्वजारोहण उरकून हैदराबादला गेलेच कसे? असे केल्याने इथल्या नव्या पिढीला मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचं महत्त्व कळणार कसं, असा सवाल विधान सभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केला. ते आज बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील कार्यक्रमात बोलत होते.    माजलगाव येथील सुंदरराव सोळंके महाविद्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. तसेच आपण अर्थमंत्री असताना मराठवाड्याला किती निधी दिला, हेही अजित पवारांनी आवर्जून सांगितलं. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, मराठवाडा मुक्तिसंग्राम आणि अमृत महोत्सवाबद्दल अनुत्साह दाखवण्यात आलाय. मी अर्थमंत्री असताना मराठवाड्यासाठी 75 कोटी निधीची पूर्तता केली

MB NEWS-सलग नऊ वेळा खासदार, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

इमेज
  सलग नऊ वेळा खासदार, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन नंदुरबार :  माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. नाशिकमध्ये खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माणिकराव गावित नंदुरबारमधून  सलग नऊ वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. शनिवार, १७ सप्टेंबर सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी त्यांनी जगाचा निरोप घेतला. ते कार्यकर्त्यांमध्ये 'दादासाहेब' म्हणून लोकप्रिय होते. माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावित यांनी ट्विटरवरुन वडिलांच्या निधनाची दुःखद बातमी दिली आहे. माणिकरावांनी १९६५ मध्ये ग्रामपंचायतीपासून राजकारणाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर केंद्रीय गृह राज्यमंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री अशी पदं न मागताच मिळाली. संसदेतील सर्वात ज्येष्ठ खासदार म्हणून त्यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्षपदही भूषवले होते. १९८१ मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा लढवली व विजयीही झाले. त्यानंतर त्यांनी सलग नऊ वर्ष विजयी टिळा मिरवला. नंदुरबार लोकसभा मतदारसंघ आणि काँग्रेस हे एक समीकरण तयार झालं होतं

MB NEWS-शेतकऱ्यांच्या जनआक्रोश धरणे आंदोलनात शासनावर अजय मुंडेंचा हल्लाबोल

इमेज
  शेतकऱ्यांच्या जनआक्रोश धरणे आंदोलनात शासनावर अजय मुंडेंचा हल्लाबोल _......तर येणाऱ्या काळात आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांसह जेलभरो करू!_ बीड, प्रतिनिधी ता. 16...... बीड जिल्ह्यातील हजारो शेतकरी आज सर्वपक्षीय जनआक्रोश धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.  बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अग्रीम पीकविमा, अनुदान, जनावरांच्या लम्पी आजारावर मुबलक लशींची उपलब्धी व्हावी आदी मागण्यांसाठी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करण्यात आले. बीड जिल्ह्यातील हजारो शेतकरी बांधव या जनआक्रोश आंदोलनात सहभागी झाले होते. या सर्वपक्षीय शेतकऱ्यांच्या जनआक्रोश आंदोलनात युवक नेते श्री. अजय मुंडे यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा पाढा वाचत प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला, मागील वर्षी आ. धनंजय मुंडे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना ज्याप्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रीम विमा मदत देण्यात आली, त्याप्रमाणे याही वर्षी विमा लागू असलेल्या सर्व पिकांना अग्रीम मदत द्यायला हवी होती

MB NEWS-विमा कवच मंडळनिहाय नव्हे तर गावनिहाय द्या- कॉ. एड. अजय बुरांडे

इमेज
  घरच्या भाकरी घेऊन भरपावसात आंदोलन:रूमणे दाखवीत शेतकऱ्यांचा विमा कंपनी व सरकारला इशारा ■विमा कवच मंडळनिहाय नव्हे तर गावनिहाय द्या- कॉ. एड. अजय बुरांडे बीड / प्रतिनिधी       सोयाबीन पिकाच्या पायी शेतकऱ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली तरी विमा कंपन्या त्यांचा हेका सोडायला तयार नाहीत. केंद्रात आणि राज्याच्या सभागृहात निवडून पाठवलेल्या प्रतिनिधींचं काम आहे की त्यांनी शेतकऱ्यांना पुरक असे निर्णय सभागृहात मंजूर करून घ्यायला हवेत. परंतु गोगलगाय आमचं सोयाबीन खाते तरी विमा कंपनी म्हणते गोगलगायीने केलेलं नुकसान किटकामध्ये मोडत नाही, सलग 27 दिवस पावसाचा खंड पडतो तरी विमा कंपनी एक ते दिड मिलिमीटर पाऊस दाखवून विमा नाकारत आहेत. आता कंपन्यांची ही मग्रुरी कदापिही खपवून घेतली जाणार नाही. सभागृहात बसलेल्या लोकप्रतिनिधींनी आता मंडळनिहाय ही संकल्पना बदलून गावनिहाय संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न करावेत. आज किसान सभा दाखवत असलेलं रूमणं कंपन्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या जिवावर राजकारण करू पाहणाऱ्यांसाठी इशारा असेल, असा खणखणीत इशारा अखिल भारतीय किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे यांनी दिला आहे. कॉ. बुरांडे

MB NEWS-शनिवार व रविवार परळी येथील जगमित्र कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस सक्रिय सदस्य नोंदणी साठी विशेष अभियान

इमेज
  शनिवार व रविवार परळी येथील जगमित्र कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस सक्रिय सदस्य नोंदणी साठी विशेष अभियान राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय सदस्य बनण्यासाठी सर्वांनी या अभियानात सहभागी व्हावे - बाजीराव धर्माधिकारी परळी (दि. 16) - माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस सक्रिय सदस्य नोंदणीसाठी आ. मुंडे यांच्या जगमित्र या संपर्क कार्यालयात शनिवार व रविवार असे दोन दिवसीय सक्रिय सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.  या अभियानात राष्ट्रवादी काँग्रेस चे सदस्य होऊ इच्छिणाऱ्या सर्वांनी सहभागी होऊन जास्तीत सक्रिय सदस्य नोंदणी करावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.  मागील तीन महिन्यांमध्ये आ. धनंजय मुंडे यांनी स्वतः हे अभियान सक्रियपणे राबवत परळी शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांशी घरोघर संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवत मोठ्या प्रमाणावर सक्रिय सदस्यांची देखील नोंदणी केली होती.  या नोंदणी केलेल्या सदस्यांचे फॉर्म एकत्र

MB NEWS- ■अभ्यासामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष नको-बी.यु.रोडे

इमेज
 ■अभ्यासामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष नको-बी.यु.रोडे  परळी / प्रतिनिधी.......शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अभ्यासाच्या ताणतणावामुळे  विद्यार्थ्यांचे आरोग्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष्य होत असून भावी आयुष्यासाठी हे धोकादायक असल्याचे मत परळी पंचायत समितीच्या बाल विकास अधिकारी बी.यु रोडे मॅडम यांनी व्यक्त केले.            परळी तालुक्यातील महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे किशोरवयीन विद्यार्थीनीकरिता आरोग्य,स्वछता,आहार व व्यक्तिमत्त्व विकास या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शिका म्हणून बोलत होते.यावेळी पंचायत समितीच्या सौ.देशमुख मॅडम,सौ.पंडित मॅडम,सौ.कराड मॅडम तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.मनीषा जाधव मॅडम आदी उपस्थित होत्या.            पुढे बोलताना सौ.रोडे म्हणाले की ,किशोरवयीन विद्यार्थिनींमध्ये सततचा अभ्यासामुळे ताण-तणाव निर्माण होतो. मुलगी असल्या कारणाने घरातील किरकोळ कामे ही त्यांना करावी लागतात.परंतु आजच्या मुली ह्या सावित्रीच्या लेकी असून स्त्री बाबतीत

MB NEWS-दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळणे हे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे फळ - तुपसागर ; पदोन्नती व विशेष कामगिरीबद्दल सन्मान

इमेज
  दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळणे हे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे फळ - तुपसागर पदोन्नती व विशेष कामगिरीबद्दल सन्मान  परळी (प्रतिनिधी)    परळी औष्णिक विद्युत  केंद्रातील विशेष कामगिरी करणाऱ्या तसेच पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांचा फुले -शाहू -आंबेडकरी अभ्यास समूहाच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ के. एस. तूपसागर म्हणाले की, परळी वीज निर्मिती केंद्राला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळणे हे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे फळ आहे. मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या मार्गदर्शनामुळे ही शक्य झाल्याचे ते म्हणाले.          परळी शक्तीकुंज वसाहतीतील एबीसी कॉलनी मध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शीतल गायकवाड हे होते. भारतरत्न युगपुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले तर याप्रसंगी फुले- शाहू- आंबेडकरी समूहाच्या वतीने अधीक्षक अभियंता ए.एस.लोणे आणि अधीक्षक अभियंता एस. एन. बुक्‍तरे यांचा पदोन्नती मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच  परळी औष्णिक विद्युत केंद्राला विशेष कामगिरीबद्दल यावर्षी

MB NEWS- *आशा व गटप्रवर्तक युनियनने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना घातला घेराव; खात्यात मानधन जमा होईपर्यंत आंदोलन*

इमेज
 आशा व गटप्रवर्तक युनियनने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना घातला घेराव; खात्यात मानधन जमा होईपर्यंत आंदोलन परळी वैजनाथ, प्रतिनिधी       आशा व गटप्रवर्तकांच्या मानधन विषयक विविध मागण्यांसाठी आज बीड जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने शहरात लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. वाजत गाजत मोर्चाने जाऊन तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. आंदोलनात आशा व गटप्रवर्तक आक्रमक झाल्या होत्या. अखेर खात्यात मानधनाची रक्कम जमा होईपर्यंत हे आंदोलन आंदोलनकर्त्यांनी सुरूच ठेवले होते. या आंदोलनाला यश आले असून तीन महिन्याचे मानधन खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे.          आशा व गटप्रर्वतकांना जुलै २०२१ मध्ये आशाना १५०० व गटप्रर्वतकांना १७०० ची वाढ झाली होती. ही वाढ एप्रील २०२२ पासून ५ महिण्याची देण्यात यावी.,आशा व गटप्रर्वतकांना सप्टेंबर २०२१ पासून आशाना २००० व गटप्रर्वतकांना ३००० ची वाढ झाली होती सदरील वाढ एप्रील २०२२ पासून देण्यात यावी., केंद्र सरकारचा कोवीड भत्ता ऑक्टोंबर २०२१ ते मार्च २०२२ पर्यंतचा ६ महिण्याचा १००० प्रमाणे देण्यात यावा तसेच गटप्रर्वतकाचे सन २०२१ २०२२ २०२२ - २०२३ चे साड्याचा मोबदला द

MB NEWS-इच्छा माझी पुरी करा म्हणणारा पोलीस कर्मचारी निलंबित

इमेज
  इच्छा माझी पुरी करा म्हणणारा पोलीस कर्मचारी निलंबित   बीड : माझी इच्छा पूर्ण कर, अन्यथा मी फाशी घेईन, अशी धमकी देत महिला अंमलदारास अश्लील मेसेज पाठवून ब्लॅकमेल करणाऱ्या अंमलदारास पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी १३ सप्टेंबरला निलंबनाचा दणका दिला. माजलगाव येथे १० सप्टेंबरला ही घटना घडली होती. हरिश्चंद्र खताळ, असे निलंबित अंमलदाराचे नाव आहे.         हरिश्चंद्र खताळ व पीडित महिला अंमलदार ग्रामीण ठाण्यात कार्यरत आहेत. २०२१ पासून ते २७ ऑगस्ट २०२२ पर्यंत हरिश्चंद्र खताळ याने व्हॉटसअॅप मेसेज करून या महिलेस त्रास दिला. ८ सप्टेंबरला रात्री घरी येऊन माझी इच्छा पूर्ण कर, अन्यथा मी फाशी घेईन, असे म्हणत धमकावून विनयभंग केला होता. त्यानंतर त्याची पोलीस पत्नी शिवकन्या निंगुळे हिने पैसे घेऊन मिटवून टाक नाही तर तुझ्यावर ३०६ नुसार गुन्हा दाखल करून तुझी बदनामी करुन तुला कुठे तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही, अशी धमकी दिली होती.पीडित महिला अंमलदाराच्या फिर्यादीवरून पो.कॉ. पो.कॉ. हरिश्चंद्र खताळ व पो.ना. शिवकन्या निंगुळे या दाम्पत्यावर शहर ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली होत

MB NEWS-भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; विविध विषयावर झाली चर्चा

इमेज
  भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; विविध विषयावर झाली चर्चा  मुंबई.... भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज सह्याद्री अतिथी ग्रहावर जाऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयावर सकारात्मक चर्चा झाल्याचे पंकजा मुंडे यांनी ट्विट करून म्हटले आहे .           राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी भेट घेऊन विविध विकासात्मक कामाबाबत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातही पुरेसा वेळ देत पंकजा मुंडे यांचे मुद्दे व विषयांवर सकारात्मक चर्चा केली. त्याचप्रमाणे काही प्रश्न तात्काळ मार्गी लावले. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या भेटीत अनेक सकारात्मक विषयावर चर्चा झाल्याचे ट्विट या भेटीनंतर पंकजा मुंडे यांनी केले आहे.      • पंकजा मुंडे यांचे असे आहे ट्विट:- "अत्यंत व्यस्त routine मध्ये असताना देखील मुख्यमंत्री  @mieknathshinde यांची @CMOMaharashtra  निवांत भेट झाली...राजकीय,सामाजिक आणि विकासाच्या मुद्यावर त्यांनी सकारात्मकता दाखवली ..लागलीच कार्

MB NEWS-जि.प.शाळेतील ७० मुलींची हिमोग्लोबीन तपासणी पोषण आहार माह अंतर्गत स्तुत्य उपक्रम!

इमेज
  जि.प.शाळेतील ७० मुलींची हिमोग्लोबीन तपासणी पोषण आहार माह अंतर्गत स्तुत्य उपक्रम! सिरसाळा (प्रतिनिधी)  पोषण आहार माह अंतर्गत पं.गुरु पार्डीकर महाविद्यालय, गृह विज्ञान विभाग व जि प कें. प्रा शाळा सिरसाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आज जि प के प्रा शाळेतील इ. सहावी ते आठवीच्या  मुलींची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.     शालेय पोषण आहार माह अंतर्गत पं.गुरु पार्डीकर महाविद्यालय गृह विज्ञान विभागाच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे, याचाच एक भाग म्हणून जि.प.के.प्रा शाळेतील विद्यार्थ्यांना संतुलित व सकास आहारा संदर्भात प्रा .डॉ. उषा माने प्रा.डॉ. अरुणा वाळके व जि प. शाळेतील सांस्कृतिक विभाग प्रमुख लक्ष्मण वैराळ यांनी मार्गदर्शन केले .व त्यानंतर दुपारच्या सत्रात प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.राधाकिशन राऊत, संदिप लांडगे, गौतम पोटभरे, नंदकुमार सोळंके यांच्या टीमने इ. सहावी ते आठवीच्या वर्गातील 70 विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन चाचणी करण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एम एम घोडके, शा.व्य.स.अध्यक्ष नासर दादा शेख केंद्रप्रमुख गंगाधर कांबळे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यश

MB NEWS-पोहनेर जिल्हा परिषद शाळेला केंद्र शासनाचा जिल्हास्तरीय 'स्वच्छ विद्यालय' पुरस्कार*

इमेज
  पोहनेर जिल्हा परिषद शाळेला केंद्र शासनाचा जिल्हास्तरीय 'स्वच्छ विद्यालय' पुरस्कार* *पंकजाताई मुंडेंच्या प्रयत्नाने शाळेला मिळाली होती नवी इमारत ; ग्रामस्थांनी मानले आभार* *जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले पुरस्काराचे वितरण* परळी ।दिनांक १५। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे ग्रामविकास मंत्री असतांना तालुक्यातील पोहनेर येथील जिल्हा परिषद शाळेला नवीन सुसज्ज व भव्य इमारत मिळाली होती, आता याच शाळेचा गौरव केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने    'स्वच्छ विद्यालय' पुरस्कार देऊन केला आहे. या पुरस्काराने पोहनेरची मान जिल्हयात उंचावली असून ग्रामस्थांनी याचे सर्व श्रेय पंकजाताईंना देत त्यांचे आभार मानले आहेत.    पंकजाताई मुंडे यांनी मागील सत्तेच्या काळात ग्रामविकास मंत्री असतांना पोहनेर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला मोठ्या प्रमाणात निधी दिल्याने शाळेला भव्य आणि सुसज्ज इमारत मिळाली होती, परिसरातील विद्यार्थ्यांची त्यामुळे चांगली सोय होऊ शकली, परिणामी विद्यार्थ्यांची पटसंख्या देखील वाढली. पंकजाताईंच्या सूचनेनुसार खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी हे गाव सांसद आदर्श ग्र

MB NEWS- *कै. ल .दे .महिला महाविद्यालयात झाला श्री.अमित जोशी यांचा 'अ-अभिनयाचा' हा भन्नाट कार्यक्रम

इमेज
 *कै. ल .दे .महिला महाविद्यालयात झाला श्री.अमित जोशी यांचा 'अ-अभिनयाचा' हा भन्नाट कार्यक्रम  परळी , दि. 15/9/20022 (प्रतिनिधी)   येथील कै. ल .दे . महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी  व त्यांच्या अभिनय कौशल्य विकासासाठी श्री अमित प्रतिमा नागराज जोशी यांच्या ' अ - अभिनयाचा ' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत त्यांनी विद्यार्थिनींना अभिनयाचे तंत्र व सादरीकरण व प्रभावी अभिनय याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष अभिनयाच्या माध्यमातून सलग दीड तास हसवत हसवत केलेले मार्गदर्शन अतिशय उच्च पातळीवरचे होते. अभिनयाच्या माध्यमातून प्रभावी रसाविष्कार कसा करता येतो. हे त्यांनी प्रत्यक्ष सादरीकरणातून दाखविले. यावेळी कार्यक्रमाविषयी प्रतिक्रिया देताना प्रा.प्रसाद देशमुख यांनी 'अ - अभिनया ' सारखे कार्यक्रम विद्यार्थिनीमध्ये अभिनय कौशल्य रुजविण्यासाठी आवश्यक आहेत. असे मत मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष संजय देशमुख हे होते . तर प्रमुख अतिथी म्हणून कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख , संचालिका डॉ. विद्याता

MB NEWS-_दहा मिनिटाचाच हाती वेळ पण पोलिसांच्या सतर्कतेेने एक बळी वाचला_

इमेज
 आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ शेअर करून "तो" झोपला रेल्वे पटरीवर!  _दहा मिनिटाचाच हाती वेळ पण पोलिसांच्या सतर्कतेेने एक बळी वाचला_  परळी वैजनाथ, .....         घरगुती कारणावरून तणावग्रस्त बनलेल्या एका इसमाने आपण रेल्वेखाली आत्महत्या करणार आहोत असा रेल्वे पटरीवरचा एक व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना व जवळच्या ग्रुपवर शेअर केला आणि तो पटरीवर आडवा झाला. दहा मिनिटातच या मार्गावरून रेल्वे जाणार होती. काळ आला होता परंतु वेळ बलवत्तर होती संभाजीनगर पोलिसांना याबाबत एक फोन आला आणि ड्युटीवर असलेल्या दुर्गे नावाच्या पोलिस कर्मचाऱ्याने अतिशय सतर्कता दाखवत त्याला शोधून काढले.पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक बळी वाचला आहे.काल दि.14 रोजी दुपारी 3.50 वा. च्या सुमारास ही घटना घडली आहे.           जोडहिंगणी तालुका धारूर जिल्हा बीड येथील कैलास विष्णुदास सोळंके नावाचा इसम काल दि.14 रोजी दुपारी 3.50 वा. च्या सुमारास परळीमध्ये आला व परळी रेल्वे स्टेशन पासून काही अंतरावर रेल्वे पटरीवर जाऊन त्याने स्वतःचा व्हिडिओ काढला. आपल्या नातेवाईकांना व जवळच्या व्हाट्सअप ग्रुप वर व्हिडिओ शेअर केला. आपण आपले जीवन संपवत अ

MB NEWS-बीड जिल्ह्यात या 47 महसूल मंडळातील शेतकर्‍यांना मिळणार अग्रीम

इमेज
  बीड जिल्ह्यात या 47 महसूल मंडळातील शेतकर्‍यांना मिळणार अग्रीम  बीड, दि. 14, (जि. मा. का.) : जिल्ह्यात पूर्वी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार 16 जुने महसूल मंडळ व त्यासहित अंतर्भूत 10 नवीन महसूल मंडळ असे एकत्रित 26 महसूल मंडळ अंतर्भूत करण्यात आली होती. नव्याने देण्यात आलेले अधिसूचनेनुसार 15 जुने महसूल मंडळ व त्या अंतर्गत 6 नवीन महसूल मंडळ अंतर्भूत असलेल्या एकूण 21 महसूल मंडळाचा समावेश करण्यात आलेला असून  अशा पद्धतीने जिल्ह्यातील एकूण 47 महसूल मंडळातील शेतकर्‍यांना नुकसानीच्या 25 टक्के अग्रीम मिळणार आहे. पीकविमा कंपनीने अग्रीम देण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय संयुक्त समिती, प्रधानमंत्री पीक विमा योजनाचे अध्यक्ष राधाबिनोद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पीकविमा कंपनीसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासंबंधी आज वाढीव 21 महसूल मंडळात 25 टक्के अग्रीम मदत देण्यासंबंधी अधिसूचना जाहीर झाली आहे. या अधिसूचनेनुसार बजाज अलाएंज जनरल इन्शुरन्स कंपनी लि. पुणे यांनी अधिसूचना जाहीर झाल्यापासून एक महिन्याच्या आत तरतूदनुसार पात्र ठरलेल्या सोयाबीन या अधिसूचित पिकाकरि