युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-पोहनेर जिल्हा परिषद शाळेला केंद्र शासनाचा जिल्हास्तरीय 'स्वच्छ विद्यालय' पुरस्कार*

 पोहनेर जिल्हा परिषद शाळेला केंद्र शासनाचा जिल्हास्तरीय 'स्वच्छ विद्यालय' पुरस्कार*




*पंकजाताई मुंडेंच्या प्रयत्नाने शाळेला मिळाली होती नवी इमारत ; ग्रामस्थांनी मानले आभार*

*जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले पुरस्काराचे वितरण*

परळी ।दिनांक १५।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे ग्रामविकास मंत्री असतांना तालुक्यातील पोहनेर येथील जिल्हा परिषद शाळेला नवीन सुसज्ज व भव्य इमारत मिळाली होती, आता याच शाळेचा गौरव केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने    'स्वच्छ विद्यालय' पुरस्कार देऊन केला आहे. या पुरस्काराने पोहनेरची मान जिल्हयात उंचावली असून ग्रामस्थांनी याचे सर्व श्रेय पंकजाताईंना देत त्यांचे आभार मानले आहेत.

   पंकजाताई मुंडे यांनी मागील सत्तेच्या काळात ग्रामविकास मंत्री असतांना पोहनेर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला मोठ्या प्रमाणात निधी दिल्याने शाळेला भव्य आणि सुसज्ज इमारत मिळाली होती, परिसरातील विद्यार्थ्यांची त्यामुळे चांगली सोय होऊ शकली, परिणामी विद्यार्थ्यांची पटसंख्या देखील वाढली. पंकजाताईंच्या सूचनेनुसार खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी हे गाव सांसद आदर्श ग्राम योजनेत समाविष्ट केल्याने कोटयवधी रूपयांची विकास कामे याठिकाणी झाली. पंकजाताईंनी दिलेल्या निधीतून उभारलेल्या याच शाळेला आता सन २०२१-२२ चा केंद्र सरकारचा जिल्हास्तरीय 'स्वच्छ विद्यालय' पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वच्छतेचे सर्व निकष पाळत फाईव्ह स्टार रेटींगसह शंभर टक्के स्कोअर या शाळेला मिळाला आहे.बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आज शाळेचे मुख्याध्यापक महेश राजुरकर व शिक्षकांचे अभिनंदन करून या पुरस्काराचे वितरण केले.

*ग्रामस्थांनी दिले पंकजाताईंना श्रेय*
-----------
दरम्यान, ग्रामस्थांनी पंकजाताईंना फोन करून शाळेला पुरस्कार मिळाल्याचे सांगितले. या शाळेचे बांधकाम आपल्याच प्रयत्नातून भव्य दिव्य करण्यात आले आणि त्याचमुळे आज आपल्या या शाळेला पुरस्कार मिळालेला आहे या पुरस्काराचे खरे श्रेय हे आपलेच आहे आम्हा सर्व पोहनेरकरांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे सर्व गावकऱ्यांच्या वतीने आपले मनःपूर्वक धन्यवाद व आभार असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या