MB NEWS-दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळणे हे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे फळ - तुपसागर ; पदोन्नती व विशेष कामगिरीबद्दल सन्मान

 दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळणे हे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे फळ - तुपसागर

पदोन्नती व विशेष कामगिरीबद्दल सन्मान 

परळी (प्रतिनिधी)   

परळी औष्णिक विद्युत  केंद्रातील विशेष कामगिरी करणाऱ्या तसेच पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांचा फुले -शाहू -आंबेडकरी अभ्यास समूहाच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ के. एस. तूपसागर म्हणाले की, परळी वीज निर्मिती केंद्राला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळणे हे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे फळ आहे. मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या मार्गदर्शनामुळे ही शक्य झाल्याचे ते म्हणाले.

         परळी शक्तीकुंज वसाहतीतील एबीसी कॉलनी मध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शीतल गायकवाड हे होते. भारतरत्न युगपुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले तर याप्रसंगी फुले- शाहू- आंबेडकरी समूहाच्या वतीने अधीक्षक अभियंता ए.एस.लोणे आणि अधीक्षक अभियंता एस. एन. बुक्‍तरे यांचा पदोन्नती मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच  परळी औष्णिक विद्युत केंद्राला विशेष कामगिरीबद्दल यावर्षी मे २०२२ मध्ये  जलव्यवस्थापन आणि ऑगस्ट २०२२ ला पर्यावरण व्यवस्थापनातील उत्कृष्टतेबद्दल  दोन राष्ट्रीय पुरस्कार  मिळाले आहेत. या बद्दल कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ के. एस. तुपसागर यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.


      यावेळी बोलताना तुपसागर यांनी परळी वीज निर्मिती केंद्र च्या कामगिरीबद्दल मुख्य अभियंता मोहन आव्हाड तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तर बुक्‍तरे यांनी सातत्य आणि संयम ठेवल्यास यश निश्चित मिळते असे म्हणाले. याप्रसंगी लोणे यांनी सामाजिक समस्येचे समाधान खऱ्या अर्थाने बहुजन ऐक्यात आहे, असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक भगवान साकसमुद्रे यांनी केले.

     या कार्यक्रमास कार्यकारी अभियंता आर एस कांबळे, अमर शिंदे, प्रीतम हनुमंते,जयवर्धन सूर्यवंशी, प्रणय हत्तीअंबीरे, उप व्यवस्थापन (मा सं ) महादेव वंजारे, बप्पासाहेब वडमारे, संतोष वंजारे, विकास बिडगर, प्रदीप चव्हाण, परमेश्वर मुंडे, अशोक धुलगुंडे, हरी चिद्रेवार, लक्ष्मण वैराळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  राहुल बनसोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार आकाश देवरे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार