युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; विविध विषयावर झाली चर्चा

 भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; विविध विषयावर झाली चर्चा 

मुंबई.... भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज सह्याद्री अतिथी ग्रहावर जाऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयावर सकारात्मक चर्चा झाल्याचे पंकजा मुंडे यांनी ट्विट करून म्हटले आहे .

          राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी भेट घेऊन विविध विकासात्मक कामाबाबत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातही पुरेसा वेळ देत पंकजा मुंडे यांचे मुद्दे व विषयांवर सकारात्मक चर्चा केली. त्याचप्रमाणे काही प्रश्न तात्काळ मार्गी लावले. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या भेटीत अनेक सकारात्मक विषयावर चर्चा झाल्याचे ट्विट या भेटीनंतर पंकजा मुंडे यांनी केले आहे.

     • पंकजा मुंडे यांचे असे आहे ट्विट:-

"अत्यंत व्यस्त routine मध्ये असताना देखील मुख्यमंत्री 

@mieknathshinde यांची @CMOMaharashtra

 निवांत भेट झाली...राजकीय,सामाजिक आणि विकासाच्या मुद्यावर त्यांनी सकारात्मकता दाखवली ..लागलीच कार्यवाहीचे आदेश ही दिले..."



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या