MB NEWS-_दहा मिनिटाचाच हाती वेळ पण पोलिसांच्या सतर्कतेेने एक बळी वाचला_

 आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ शेअर करून "तो" झोपला रेल्वे पटरीवर!

 _दहा मिनिटाचाच हाती वेळ पण पोलिसांच्या सतर्कतेेने एक बळी वाचला_ 

परळी वैजनाथ, .....

        घरगुती कारणावरून तणावग्रस्त बनलेल्या एका इसमाने आपण रेल्वेखाली आत्महत्या करणार आहोत असा रेल्वे पटरीवरचा एक व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना व जवळच्या ग्रुपवर शेअर केला आणि तो पटरीवर आडवा झाला. दहा मिनिटातच या मार्गावरून रेल्वे जाणार होती. काळ आला होता परंतु वेळ बलवत्तर होती संभाजीनगर पोलिसांना याबाबत एक फोन आला आणि ड्युटीवर असलेल्या दुर्गे नावाच्या पोलिस कर्मचाऱ्याने अतिशय सतर्कता दाखवत त्याला शोधून काढले.पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक बळी वाचला आहे.काल दि.14 रोजी दुपारी 3.50 वा. च्या सुमारास ही घटना घडली आहे.

          जोडहिंगणी तालुका धारूर जिल्हा बीड येथील कैलास विष्णुदास सोळंके नावाचा इसम काल दि.14 रोजी दुपारी 3.50 वा. च्या सुमारास परळीमध्ये आला व परळी रेल्वे स्टेशन पासून काही अंतरावर रेल्वे पटरीवर जाऊन त्याने स्वतःचा व्हिडिओ काढला. आपल्या नातेवाईकांना व जवळच्या व्हाट्सअप ग्रुप वर व्हिडिओ शेअर केला. आपण आपले जीवन संपवत असून आपल्या घरगुती ताणतणावातून आपण हे पाऊल उचलत असल्याचे या व्हिडिओवर त्याने म्हटले. यादरम्यान  परळी रेल्वे स्थानकातून 4.05 वा. सुटणारी परभणीकडे जाणारी रेल्वे गाडी निघण्याच्या तयारीतच होती. दहा ते बारा मिनिटाच्या कालावधीत रेल्वे या मार्गावरून जाणार होती. या याबाबत हा व्हिडिओ पाहिलेल्या कोणीतरी व्यक्तीने पोलिसांच्या मदत क्रमांक 112 वर फोन करून ही माहिती दिली.  यावेळी ड्युटीवर असणारे पोलीस कर्मचारी मोहन दुर्गे यांनी फोनवर मिळालेली माहिती व हा व्हिडिओ पाहून घटनास्थळाचा अंदाज बांधला. त्याचबरोबर संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांना ही बाब कळवली. पो.नि. चाटे  यांनी तातडीने याबाबत घटनास्थळ शोधून आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलीस कर्मचारी मोहन दुर्गे, पोलीस हवालदार आनंत होळंबे, बालासाहेब चाटे यांना पाठवले. त्याचप्रमाणे आरपीएफ परळी यांनाही कळवले. अवघ्या दहा मिनिटाच्या कालावधीत पोलिसांनी घटनास्थळ शोधून काढत या व्यक्तीला ताब्यात घेतले आणि एक जाणारा बळी वाचला आहे. आत्महत्या करण्यास निघालेल्या या इसमास पोलीस ठाण्यात आणून त्याचे व्यवस्थित समुपदेशन करून त्याला त्याच्या नातेवाईकाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

       दरम्यान नवरा बायकोतील वाद व त्यातून त्यांच्या संसारात आलेला अडसर यातून हा इसम गेल्या काही दिवसापासून प्रचंड तणावाखाली असल्याचे नातेवाईक  सांगत आहेत. या तणावातूनच त्याने आत्महत्येला प्रवृत्त होवून हे पाऊल उचलले. परंतु परळीच्या संभाजीनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक आत्महत्या वाचलीआहे. संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या या कार्यतत्परतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

                        ■Video 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार