MB NEWS-शनिवार व रविवार परळी येथील जगमित्र कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस सक्रिय सदस्य नोंदणी साठी विशेष अभियान

 शनिवार व रविवार परळी येथील जगमित्र कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस सक्रिय सदस्य नोंदणी साठी विशेष अभियान

राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय सदस्य बनण्यासाठी सर्वांनी या अभियानात सहभागी व्हावे - बाजीराव धर्माधिकारी

परळी (दि. 16) - माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस सक्रिय सदस्य नोंदणीसाठी आ. मुंडे यांच्या जगमित्र या संपर्क कार्यालयात शनिवार व रविवार असे दोन दिवसीय सक्रिय सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. 


या अभियानात राष्ट्रवादी काँग्रेस चे सदस्य होऊ इच्छिणाऱ्या सर्वांनी सहभागी होऊन जास्तीत सक्रिय सदस्य नोंदणी करावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे. 


मागील तीन महिन्यांमध्ये आ. धनंजय मुंडे यांनी स्वतः हे अभियान सक्रियपणे राबवत परळी शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांशी घरोघर संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवत मोठ्या प्रमाणावर सक्रिय सदस्यांची देखील नोंदणी केली होती. 


या नोंदणी केलेल्या सदस्यांचे फॉर्म एकत्र संकलित करणे, तसेच नवीन सक्रिय सदस्यांची नोंदणी करणे यासाठी शनिवार (दि. 17) व रविवार असे दोन दिवस विशेष अभियान राबविण्यात येत असून या अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी केली जाणार असल्याचे बाजीराव धर्माधिकारी यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !