इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-लावण्याई पब्लिक स्कूल मध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा

 *इंग्रजी माधयामातुन शिका पण भारतीय संस्कृती जपा- डाॅ सुरेश चौधरी


भविष्यात  हीच मुले  शाळेचे  नाव उज्ज्वल  करतील-प्रा. डाॅ.  जगतकर 


 लावण्याई  पब्लिक स्कूल मध्ये  मराठवाडा  मुक्ती  संग्राम  दिन  उत्साहात  साजरा


परळी वैजनाथ  (प्रतिनिधी )  17 सप्टेंबर या मराठवाडा  मुक्ती  संग्राम  दिन  लावण्याई पब्लिक स्कूल  मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बोलतांना डाॅ चौधरी   म्हणाले  की, मुलांना ईंग्रजी माध्यमातुन  शिकवा पण हे शिक्षण घेत असतांना आपली भारतीय संस्कृती जपली पाहिजे असे मत या वेळी बोलतांना व्यक्त केले तर प्रा. डाॅ  विनोद  जगतकर यांनी मोलाचे मार्गदर्शन करून  लावण्याई  पब्लिक  स्कुल  मधील  मुले  भविष्यात  मोठे  होवुन  शाळेचे  नाव उज्वल  करतील असा विश्वास असल्याचे प्रा डॉ  जगतकर  यांनी बोलताना व्यक्त  केले 

       लावण्याई पब्लिक स्कूल मध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डाॅ  सुरेशचंद्र चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमात लक्ष्मीबाई देशमुख  महिला  महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख  प्रा.  डाॅ  विनोद  जगतकर, माजी  सैनिक  दता  नागापुरे, रविंद्र  पुराणिक,  मुख्याध्यापक अस्मिता  गोरे ( जैन),  शाळेचे  अध्यक्ष  अनंत  कुलकर्णी  आदि  मान्यवर  उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना डाॅ चौधरी म्हणाले की, प्रत्येक  पालकांना  वाटते  आपला मुलगा, मुलगी इंग्लिश मधुन बोलता आले पाहिजे, वाचता आले पाहिजे हे ठिक आहे   ईंग्रजी  शिकत  असतांना  आपली संस्कृतीचा  मुलांना  विसर  पडता कामा नये  या कडे  लक्ष  देणे गरजेचे आहे तरच आपली  संस्कृती टिकले  असे मत  व्यक्त  केले.  या नंतर  प्रा  डाॅ  विनोद  जगतकर  यांनी पुढे बोलताना सांगितले की, या लावण्याई  पब्लिक  स्कुल  मधील    मुले  नक्कीच  भविष्यात शाळेचे नाव केल्याशिवाय  राहणार  नाहीत तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याचा इतिहास त्यांनी मुलांसमोर ठेवला. हा इतिहास पुढील पिढीला माहिती असणे आवश्यक आहे. तसेच हे मराठवाडा मुक्ती लढ्याचे अमृत महोत्सवी वर्षे असून वर्षे भर विविध कार्यक्रमातून हा इतिहास मांडला पाहिजे  असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमात  मराठवाडा  मुक्ती  संग्राम  दिनानिमित्त  मुलांनी  भाषणे  केले . 

या कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन  पुजा बिडवे  यांनी केले तर प्रास्ताविक   कविता  विधै  यांनी केले शेवटी आभार प्रदर्शन   वैष्णवी  स्वामी  यांनी  केले . या वेळी शाळेतील  शिक्षिका  हर्षदा  परदेशी  व शेख सर उपस्थित  होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!