MB NEWS-भेल सेकंडरी स्कूल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि " निधी समर्पणाचा कार्यक्रम

 भेल सेकंडरी स्कूल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि " निधी समर्पणाचा कार्यक्रम 





परळी.वै:

   येथील बीड जिल्ह्य़ातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचलित एकमेवाद्वितीय भेल संकुलात " मराठवाडा मुक्ति संग्राम दिन" मा.श्री.राम पोरवालजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करूण साजरा करण्यात आला. मराठवाडा मुक्ति संग्राम हे हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढ्यातील एक उज्ज्वल व लोक विलक्षण पर्व आहे.मराठवाड्याच्या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या ज्ञात- अज्ञात हुतात्म्यांना व त्यांच्या अतुलनीय शौर्याची स्मृती सदैव जागृत ठेवण्यासाठीच हा दिन साजरा केला जातो.या दिनाचे औचित्य साधून इ.स 2021-22 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीतील ( स्टेट व सी.बी.एस.ई पॅटर्न) मधील विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसोबत यथोचित सत्कार मान्यवरांकडून करण्यात आला. तसेच दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्व. अजित विकासराव डुबे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मा.श्री.विकासराव डुबे यांनी भेल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी  विविध विषयांवरील पुस्तके खरेदीसाठी अकरा हजार रु.चा धनादेश संकुलाचे प्राचार्य. श्री.एन.एस.राव सर यांच्याकडे सुपूर्द केला.तसेच संकुलातील विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धात्मक युगात टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा परिक्षा जसे की एम.टी.एस., शिष्यवृत्ती, ऑलिम्पियाड ई.मार्गदर्शन अनुभवी शिक्षकांकडून देण्याचा  शाळेचा भर असतो. ऑलिम्पियाड स्पर्धेतील इंग्लिश, विज्ञान आणि गणित या विषयात श्रेणी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही त्यांच्या पालकांसोबत मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला. तसेच न भुतो न भविष्यती असा एक कार्यक्रम झाला तो म्हणजे व्यवस्थापणाकडून शिक्षकांचा गौरव व शिक्षकांकडून व्यवस्थापन सभासदांचा सत्कार सोहळा हा होय.

        याप्रसंगी भा.शि.प्र.संस्थेतील मा.श्री.अरुणजी डंके सर ( प्रांत. सहकार्यवाह,रा.स्व. संघ, जनकल्याण समिती,महाराष्ट्र प्रांत) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.तसेच भेल संकुलाच्या शालेय समिती अध्यक्ष पितृतुल्य, गुरुवर्य मा.श्री.वसंतराव देशमुख, स्थानिक समन्वयक समिती अध्यक्ष मा.श्री.विकासराव डुबे ,मा.श्री.डाॅ.सतिशजी रायते( सदस्य),श्री.विष्णुपंत कुलकर्णी, श्री.दत्तापा इटके ,श्री.जीवनावर गडगूळ, संकुलाच्या प्रमुख आधारस्तंभ, माजी प्राचार्य सौ.शोभा भंडारी (सदस्य) मा.श्री.ॲड.राजेश्वर  देशमुख, प्रगत उद्योजक श्री.अमोल डुबे,संकुलाचे प्राचार्य मा.श्री.एन.एस.राव( cbse), प्राचार्य श्री.पाटील. पी.व्ही ( state)

 सर्व विभाग प्रमुख आणि संकुलातील  सुज्ञ,अनुभवी व उच्च विद्याविभूषित शिक्षकवृंद, विद्यार्थी व मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होते.

   यावेळी 40 वर्षापुर्वी लावलेल्या रोपटयाचे रुपांतर आता एका वटवृक्षात करण्यात शालेय व्यवस्थापन समिती व प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन अल्प मानधनावर ज्ञानदानाचे पवित्र कार्य पार पाडणारे शिक्षकांनी अनेक डॉक्टर, इंजिनिअर, चार्टर्ड अकाउंटट ( सी.ए) वकील,प्रगत उद्योजक, संस्कारक्षम व जबाबदार भारतीय नागरिक घडविले.अशा संकुलातील सर्व शिक्षकांचाही मान्यवरांकडून गौरव करण्यात आला.आजही या संकुलात हजारोंच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ही एक उल्लेखनीय बाब आहे.

      यावेळी पुढे बोलतांना मा.श्री.अरुणजी डंके म्हणतात की  विविध संस्कृत सुभाषिताद्वारे कठिण परिश्रम घेतल्याशिवाय यश हे मिळत नाही त्यासाठी आपण खडतर परिश्रम हे करावे लागतात. त्याबरोबरच त्यांनी प्रत्येकाला तीन ऋण फेडावे लागतात.मातॄॠण, पितृऋण आणि समाजऋण होय. आईचे महत्व पटवून देतांना म्हणतात की आई हीच प्रथम गुरू असते.लौकिक गुरू व अध्यात्मिक गुरू याविषयी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना श्री.वसंतराव देशमुख यांनीही विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धात्मक युगात टिकूण राहण्यासाठी काय करावे लागेल यावर आपले विचार व्यक्त केले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रोहिणी वाकडे मॅडम यांनी आपल्या खुमासदार शैलीत व चपखल चारोळ्या यांचा वापर करून काव्यात्मक पध्दतीने करूण प्रेक्षकांना खिळवून ठेवले व आभार प्रदर्शन सौ. संध्या आदोडे मॅडम  यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संकुलातील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले आणि पसायदान घेऊन या कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !