MB NEWS-पोहण्यासाठी गेलेल्या डॉक्टरचा तळ्यात बुडून मृत्यू

 पोहण्यासाठी गेलेल्या डॉक्टरचा तळ्यात बुडून मृत्यू



धारूर.....

धारूर तालुक्यातील तेलगाव येथील डॉ फपाळ हे माजलगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेले असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजे दरम्यान घडली.

धारूर तालुक्यातील तेलगाव येथे रुग्णसेवा देणारे डॉ. दत्ता फपाळ वय 40 वर्ष (रा.बेलुरा ता.माजलगांव)मयत डॉक्टरचे नाव असून ते सकाळी मित्रांसमवेत माजलगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान तळ्यात पाणी जास्त असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. पाणि जास्त प्रमाणात असल्याने प्रेत सापडत नसुन बीड येथील पथक घटनास्थळी येत असल्याची माहिती आहे. डॉ. फपाळ हे यांचा तेलगाव येथे दवाखाना असून तेलगाव परिसरात सुप्रसिद्ध असलेल्या डॉक्टरचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!