युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS- *■मराठवाडा मुक्ती संग्रामाचा पाठय पुस्तकात समावेश व्हावा-डॉ.विवेक मॉंटोरो*

 ■मराठवाडा मुक्ती संग्रामाचा पाठय पुस्तकात समावेश व्हावा-डॉ.विवेक मॉंटोरो



परळी / प्रतिनिधी

देशाच्या स्वतंत्र संग्रामाप्रमाणे मराठवाडा मुक्ती संग्राम इतिहास आहे.निजामशाहीच्या जुलमी राजवटीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी मराठवाड्यात अनेकांनी आपल्या जीवाची आहुती देत शहीद झाले.मराठवाडा मुक्ती संग्राम इतिहास भावी पिढीला कळवा,त्यातून प्रेरणा मिळावी याकरिता मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास पाठय पुस्तकात असावा असे मत संशोधन,गणितज्ञ डॉ.विवेक मॉंटोरो यांनी व्यक्त केले.


परळी तालुक्यातील महाराष्ट्र प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मोहा येथे 74 व्या मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.या प्रसंगी पुणे येथील नवनिर्मिती फौंडेशनच्या संचालिका गीता महाशब्दे, स्वाती मोरे,संस्थेचे सचिव एड.अजय बुरांडे,जेष्ठ संचालक सुदामदादा देशमुख, सुदाम शिंदे,सखाराम शिंदे आदी उपस्थित होते.या प्रसंगी डॉ.विवेक मॉंटोरो यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न झाले.


अमेरिका येथील जागतिक ख्यातीचे स्टोनी ब्रूक या विद्यापीठातून गणितीय भौतिकशास्त्र या विषयात पीएचडी करून राज्यात गणित विषयात संशोधन व प्रशिक्षण देण्याचे कार्य करणारे डॉ.विवेक मॉंटोरो यांनी पुढे बोलताना सांगितले की मराठवाडा मुक्ती संग्राम खूप मोठा आहे.देशाला स्वातंत्र्य मिळवून ही निजाम आपले साम्राज्य स्वतंत्र भारतात विलीन करण्यास तयार नव्हता मात्र मराठवाड्यातील स्वामी रामानंद तीर्थ,गोविंद भाई श्राफ, कॉ.गंगाधर अप्पा बुरांडे या सारख्या असंख्य झुंजार स्वातंत्र्यसेनानी मराठवाडा मुक्तीसाठी आपले जीवन समर्पित केले अनेकांनी आपल्या जीवाची आहुती दिली.हा इतिहास खूप मोठा असून याचा समावेश होणे अपेक्षित असताना मात्र विद्यमान काळात केवळ शिक्षण क्षेत्राचे खाजगीकरण करण्यावर भर देण्याचे सुरू असल्याचे सांगितले.


या ध्वजारोहण प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण देशभक्तीमय केले.हा कार्यक्रम यशस्वी संपन्न करण्यासाठी शाळेचे प्राचार्य धनंजय देशमुख, उपमुख्याध्यापक सुरेश बुरांडे,पर्यवेक्षक विनायक राजमाने,प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनीषा जाधव मॅडम,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या