इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-धरणात बुडालेल्या डॉक्टरांचा शोध घेणाऱ्या पथकातील जवान पाण्यात बेपत्ता

 धक्कादायक: माजलगाव धरणात बुडालेल्या डॉक्टरांचा शोध घेणाऱ्या पथकातील जवान पाण्यात बेपत्ता

    माजलगाव येथील धरणात बुडालेल्या डाॕ.फपाळ यांना शोधण्यासाठी कोल्हापुर येथील जवान ही यात पाण्यात बेपत्ता झाला आहे.

        धारूर तालुक्यातील तेलगाव येथील डॉ फपाळ हे माजलगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेले असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजे दरम्यान घडली.

संबंधित बातमी:माजलगाव धरणात डॉक्टर बुडाला

धारूर तालुक्यातील तेलगाव येथे रुग्णसेवा देणारे डॉ. दत्ता फपाळ वय 40 वर्ष (रा.बेलुरा ता.माजलगांव)मयत डॉक्टरचे नाव असून ते सकाळी मित्रांसमवेत माजलगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान तळ्यात पाणी जास्त असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. पाणि जास्त प्रमाणात असल्याने प्रेत अद्याप सापडलेले नाही.

   डॉ. फपाळ यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी बीड, परळी, येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करीत होते. आज त्यांच्या मदतीला कोल्हापूर येथील एनडीआरएफची टीम धावून आली. या टिमने शोधकार्य सुरू केले. मात्र धरणात मच्छिमारांनी लावलेल्या जाळ्यात अडकून टीममधील दोन सदस्य पाण्याखाली अडकून पडले. त्यांना बाहेर काढताना झालेल्या खेचाखेचीत राजू मोरे यांचा ऑक्सिजन सिलींडर निसटून वर आला. साधारण 45 मिनिटांपासून त्यांचाही शोध बचाव पथकातील कर्मचारी घेत आहेत. तर दुसऱ्या एका शुभम काटकर या कर्मचाऱ्याला 15 मिनिटानंतर बीडच्या बचाव पथकाने वर काढले. त्याच्यावर माजलगावच्या देशपांडे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी निलम बाफना, तहसीलदार वर्षा मनाळे, मुख्याधिकारी विशाल भोसले, माजलगाव शहर पोलीस ठाण मांडुुन आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या