MB NEWS-बीड जिल्ह्यात या 47 महसूल मंडळातील शेतकर्‍यांना मिळणार अग्रीम

 बीड जिल्ह्यात या 47 महसूल मंडळातील शेतकर्‍यांना मिळणार अग्रीम 




बीड, दि. 14, (जि. मा. का.) :


जिल्ह्यात पूर्वी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार 16 जुने महसूल मंडळ व त्यासहित अंतर्भूत 10 नवीन महसूल मंडळ असे एकत्रित 26 महसूल मंडळ अंतर्भूत करण्यात आली होती.

नव्याने देण्यात आलेले अधिसूचनेनुसार 15 जुने महसूल मंडळ व त्या अंतर्गत 6 नवीन महसूल मंडळ अंतर्भूत असलेल्या एकूण 21 महसूल मंडळाचा समावेश करण्यात आलेला असून  अशा पद्धतीने जिल्ह्यातील एकूण 47 महसूल मंडळातील शेतकर्‍यांना नुकसानीच्या 25 टक्के अग्रीम मिळणार आहे.

पीकविमा कंपनीने अग्रीम देण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय संयुक्त समिती, प्रधानमंत्री पीक विमा योजनाचे अध्यक्ष राधाबिनोद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पीकविमा कंपनीसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासंबंधी आज वाढीव 21 महसूल मंडळात 25 टक्के अग्रीम मदत देण्यासंबंधी अधिसूचना जाहीर झाली आहे. या अधिसूचनेनुसार बजाज अलाएंज जनरल इन्शुरन्स कंपनी लि. पुणे यांनी अधिसूचना जाहीर झाल्यापासून एक महिन्याच्या आत तरतूदनुसार पात्र ठरलेल्या सोयाबीन या अधिसूचित पिकाकरिता खालीलप्रमाणे महसूल मंडळातील सर्व पीक विमा धारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या 25 टक्के आगाऊ रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महसूली मंडळ व कंसात तालुका पुढीलप्रमाणे  - अंमळनेर, कुसलंब (ता. पाटोदा), धोंडराई, रेवकी, पाचेगाव, पाडळसिंगी, तलवाडा, कोळगाव (ता. गेवराई), होळ, चिंचोलीमाली, मस्साजोग (ता. केज), तितरवणी, शिरूर कासार, ब्र येलंब, गोमळवाडा (ता. शिरूर कासार), कवडगाव (ता. वडवणी) बीड, राजुरी नवगण, पारगाव सि., पेंडगाव, कुर्ला, नाळवंडी, येळंबघाट, घाटसावळी, चऱ्हाटा (ता. बीड), दिंदरुड, मंजरथ (ता. माजलगाव), दौला वडगाव, दादेगाव (ता. आष्टी), उजनी (ता. अंबाजोगाई), मोहा (ता. परळी वै.)

यापूर्वी दि. 9 सप्टेंबर रोजी अधिसूचित करण्यात आलेली महसूली मंडळे पुढीलप्रमाणे -

नेकनूर, पिंपळनेर, लिंबा गणेश (ता. बीड), धानोरा पिंपळा (ता. आष्टी), जातेगांव, मादळमोही, चकलंबा (ता. गेवराई), माजलगाव, कि. आडगाव, तालखेड, नितृड (ता. माजलगाव), अंबेजोगाई, घाट नांदूर (ता. अंबेजोगाई), ह. पिंप्री (ता. केज), शिरसाळा (ता. परळी वै.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार