MB NEWS- ■अभ्यासामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष नको-बी.यु.रोडे

 ■अभ्यासामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष नको-बी.यु.रोडे 


परळी / प्रतिनिधी.......शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अभ्यासाच्या ताणतणावामुळे  विद्यार्थ्यांचे आरोग्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष्य होत असून भावी आयुष्यासाठी हे धोकादायक असल्याचे मत परळी पंचायत समितीच्या बाल विकास अधिकारी बी.यु रोडे मॅडम यांनी व्यक्त केले.

           परळी तालुक्यातील महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे किशोरवयीन विद्यार्थीनीकरिता आरोग्य,स्वछता,आहार व व्यक्तिमत्त्व विकास या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शिका म्हणून बोलत होते.यावेळी पंचायत समितीच्या सौ.देशमुख मॅडम,सौ.पंडित मॅडम,सौ.कराड मॅडम तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.मनीषा जाधव मॅडम आदी उपस्थित होत्या.

           पुढे बोलताना सौ.रोडे म्हणाले की ,किशोरवयीन विद्यार्थिनींमध्ये सततचा अभ्यासामुळे ताण-तणाव निर्माण होतो. मुलगी असल्या कारणाने घरातील किरकोळ कामे ही त्यांना करावी लागतात.परंतु आजच्या मुली ह्या सावित्रीच्या लेकी असून स्त्री बाबतीत असलेल्या रूढी,परंपरा ह्या झुगारून विज्ञानवादी बनल्या आहेत पण शिक्षणाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्या आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असून भविष्यात हे धोक्याचे ठरू शकते त्यामुळे जेवढे महत्व अभ्यासाला देण्यात येते तेवढेच महत्व आरोग्य व व्यक्तिगत स्वछता याकडे देने ही महत्वाचे आहे.नाजूक प्रश्नावर सहसा बोलण्यात संकोच करणाऱ्या विद्यार्थिनींना विविध खेळ घेऊन त्यांना आपलेसे करून त्यांच्या समस्या जाणून त्यावर समुपदेशन यावेळी करण्यात आले.यावेळी उपस्थित सौ.देशमुख मॅडम यांनी आहार व व्यक्तिमत्त्व विकास यावर मार्गदर्शन केले. शेवटी या शिबिराचा अध्यक्षीय समारोप करतेवेळी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.जाधव मॅडम यांनी शालेय जीवनात विद्यार्थिनींमधील शिस्त कशी असावी यावर मार्गदर्शन केले.

     या कार्यक्रमाचे औपचारिक प्रास्ताविक शाळेचे विज्ञान शिक्षक अनुप कुसुमकर तर सूत्रसंचलन शालेय विद्यार्थिनीं  कु.अर्पिता सोळंके हिने केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार