MB NEWS- मुख्यमंत्री काही मिनिटात ध्वजारोहण उरकून हैदराबादला गेलेच कसे? -अजित पवारांचा निशाना

 मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन:सरकारकडून झालेली बेफिकिरी दुर्दैवी -अजित पवार


मुख्यमंत्री काही मिनिटात ध्वजारोहण उरकून हैदराबादला गेलेच कसे? -अजित पवारांचा निशाना


बीड दि. 17 - महाराष्ट्रात मराठवाडा मुक्ति संग्राम
दिनाचे कार्यक्रम घ्यायचे सोडून मुख्यमंत्री काही मिनिटात ध्वजारोहण उरकून हैदराबादला
गेलेच कसे? असे केल्याने इथल्या नव्या पिढीला मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचं महत्त्व कळणार कसं, असा सवाल विधान सभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केला. ते आज बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील कार्यक्रमात बोलत होते.
   माजलगाव येथील सुंदरराव सोळंके महाविद्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. तसेच आपण अर्थमंत्री असताना मराठवाड्याला किती निधी दिला, हेही अजित पवारांनी आवर्जून सांगितलं. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, मराठवाडा मुक्तिसंग्राम आणि अमृत महोत्सवाबद्दल अनुत्साह दाखवण्यात आलाय. मी अर्थमंत्री असताना मराठवाड्यासाठी 75 कोटी निधीची पूर्तता केली होती. मराठवाडा मुक्तिसंग्राम महोत्सव अमृत महोत्सवी वर्षाप्रमाणेच साजरा करायला हवा होता. ही जबाबदारी धनंजय मुंडेंसह इतर नेत्यांना देण्यात आली होती. पण सरकार येत असतात आणि जात असतात. सरकारकडून झालेली बेफिकिरी दुर्दैवी आहे.
            औरंगाबाद येथील ध्वजारोहणाचा कार्यक्रम घाईत उरकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हैदराबादेत गेले. पण तिथला कार्यक्रम महाराष्ट्रात इथे घ्यायला हवा होता. मराठवाड्याच्या इतिहासाला यानिमित्ताने उजाळा मिळाला असता, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. बीड जिल्ह्याने अनेक सामाजिक राजकीय नेते महाराष्ट्राला दिले आहेत, त्यांची आठवण सांगत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा उल्लेखही अजित पवार यांनी आपल्या भाषणात केला.
   आम्ही सत्तेत आसतोत तर वेदांत प्रकल्प महाराष्ट्रा बाहेर जावुच दिला नसता - अजित पवार 
          महाराष्ट्रातील शिंदे सरकार येवुन जवळ पास ९० दिवस झाले. तरी यांना राज्याचा काहीच विकास करायाचा नाही.आघाडी सरकारने घेतलेले राज्याच्या हिताचे घेतलेले निर्णय रद्द करण्याचे काम करत आसल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी करुन जर राज्यात आमचे सरकार आसते तर वेदांत प्रकल्प आम्ही राज्या बाहेर जावुच दिला नसता आसे पञकार परिषदेत म्हटले आहे.
   माजलगाव शहरातील विविध कामाच्या उदघाटनासाठी राज्याचे विरोधीपक्ष नेते आजित पवार आले आसता. आयोजित केलेल्या पञकार परिषदेत बोलत होते. राज्यातील शिंदे फडवणीस सरकारवर आसुड ओढत राज्याला आघाडी सरकार प्रगतीपथाकडे घेऊन जात आसतांना हे सरकार पाडण्याचे महापाप भाजपाने केले आसुन आघाडी सरकारने राज्याच्या हिताचे घेतलेले निर्णय रद्द करण्याचा सपाटा लावला आसुन आज तीन महिने झाले.तरी यांनी काहीच  करता उलट वेदांत प्रकल्पाला पर्यावरण च्या दृष्टीने चांगले वातावरण आसतांना या शिंदे फडवणीस सरकारने दिल्लीच्या इशा-याने  हा प्रकल्प  महाराष्ट्रा बाहेर घालवुन राज्यातील लाखो तरुणांचा रोजगार हिरावुन घेण्याचे महापाप  केले आहे.
   दुसरा नविन प्रकल्प आनन्याच्या वल्गना केल्या जात आहेत.माञ आरे.वेदांत प्रकल्प राहु दयायचा ना काय बिघडल  जर राज्यात आमचे सरकार आसते तर आम्ही हा प्रकल्प राज्या बाहेर जावुच दिला नसता.आसे पञकार परिषदेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे.
   या वेळी आ.प्रकाश सोळंके ,माजी मंञी धनंजय मुंडे, बाबुराव पोटभरे , आ.संदिप क्षिरसागर , अशोकराव डक , संभाजी शेजुळ , मा.आ.आमरसिंह पंडित यांच्या सह अन्य या पञकार परिषदेस उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार