इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS- दुहेरी संकट: शेतकरी चिंताग्रस्त

 भाव वाढण्याची वाट बघणार्‍या शेतकऱ्यांच्या घरातच सोयाबीनला  लागल्या अळ्या ; शेतकरी हवालदिल



 





परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

        गेल्या वर्षीचे सोयाबीन मोठ्या प्रमाणावर साठा झालेले आहे. आज ना उद्या भाव मिळेल या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी अडचणींचा सामना करत या सोयाबीनची साठवणूक करून ठेवली मात्र यावर्षीचे सोयाबीन निघण्याची वेळ आली तरी सोयाबीनला अपेक्षित भाव काही आला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल बनला असून आता शेतकऱ्यांच्या घरी असलेले सोयाबीन जागेवरच वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणावर साठा असलेल्या सोयाबीनला जागेवरच अळ्या लावायला सुरुवात झाली आहे.त्यामुळे कवडीमोल भावाने सोयाबीन विकण्याशिवाय आता शेतकऱ्यांसमोर पर्याय उरलेला नाही.

         गेल्या वर्षी सुरुवातीला सोयाबीनला चांगला भाव होता. त्यानंतर सोयाबीनचे भाव घसरले. गेल्या सहा महिन्यापासून सोयाबीनचे भाव घसरलेलेच राहिले. बाजारपेठेत सोयाबीनला उठाव नसल्याने सोयाबीनच्या किमती वाढल्या नाही. आज ना उद्या अपेक्षित भाव वाढेल याची वाट बघणारा शेतकरी आता मात्र हातचेही गेले आणि पदरचेही गेले अशा अवस्थेत सापडला आहे. कारण घरात साठवून ठेवलेले सोयाबीन जागेवर कुजून जात आहे. वजनही घटले आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर सोयाबीनला किडा व अळ्या लागायला सुरुवात झाली आहे. सध्या बाजारपेठेत सोयाबीनला प्रतिक्विंटल पाच हजार रुपये सरासरी एवढा भाव आहे. मात्र इतके दिवस जपून ठेवलेले सोयाबीन आता वाया जाणार असल्याने मिळेल त्या कवडीमोल भावात सोयाबीन विक्री करण्याशिवाय शेतकऱ्यासमोर पर्याय उरलेला नाही. यामुळे  अगोदरच पावसामुळे अडचणीत आलेला शेतकरी वर्ग मोठ्या अर्थिक संकटात सापडला आहे. कधी अति पाऊस झाल्याने तर आता पाऊस नसल्याने व पिकांवर पडणाऱ्या वेगवेगळ्या रोगांमुळे उभ्या पिकांच्या नुकसानी मोठ्या प्रमाणावर होत असताना घरात असलेले नगदी पीकही हातचे जाणार असल्याने शेतकरी वर्ग अधिकच चिंतेत सापडला आहे.

घरातलं आणि शेतातलं सोयाबीन वाया जात असल्याने शेतकरी दुहेरी संकटात

     दरम्यान घरात साठवलेल्या सोयाबीनला भाव लागेल या आशेने थांबलेल्या शेतकऱ्याला घरातल्या सोयाबीन जागेवरच वाया जाताना दिसत आहे तर दुसरीकडे शेतातील सोयाबीनचे पीक पावसामुळे व पावसाभावी आणि विविध रोगामुळे रानात वाया जात आहे त्यामुळे घरातही आणि रानातलेही सोयाबीन वाया जाताना धडधडीत शेतकऱ्यांना डोळे उघडून बघावे लागत आहे यामुळे या दुहेरी संकटात शेतकरी मोठ्या प्रमाणावर सापडला आहे.

घरातलं आणि शेतातलं सोयाबीन वाया जात असल्याने शेतकरी दुहेरी संकटात

     दरम्यान घरात साठवलेल्या सोयाबीनला भाव लागेल या आशेने थांबलेल्या शेतकऱ्याला घरातल्या सोयाबीन जागेवरच वाया जाताना दिसत आहे तर दुसरीकडे शेतातील सोयाबीनचे पीक पावसामुळे व पावसाभावी आणि विविध रोगामुळे रानात वाया जात आहे त्यामुळे घरातही आणि रानातलेही सोयाबीन वाया जाताना धडधडीत शेतकऱ्यांना डोळे उघडून बघावे लागत आहे यामुळे या दुहेरी संकटात शेतकरी मोठ्या प्रमाणावर सापडला आहे.

@@@

       "  अनेक अडचणी असताना सुद्धा सोयाबीनला भाव येईल म्हणून सोयाबीन घरी थप्पी लावून ठेवले पण अजून काही भाव मिळाला नाही तसेच शेतात उभे असलेल्या सोयाबीनलाही पावसामुळे आणि विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे पीक हातात येईल याची शक्यता कमीच आहे त्यामुळे आमच्यासारख्या शेतकऱ्यांना यंदा खूप मोठे नुकसान सहन करावे लागत आहे शासनाने याचा विचार करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात दिला पाहिजे. "

  •                   - व्यंकटी मुंडे ,
  •                   शेतकरी, चोपनवाडी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या