इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-माजलगाव धरणात बुडालेल्या शोध पथकातील जवानाचा बुडून मृत्यू;मृतदेह सापडला

  माजलगाव धरणात बुडालेल्या शोध पथकातील जवानाचा बुडून मृत्यू;मृतदेह सापडला

माजलगाव............

    माजलगाव येथील धरणात बुडालेल्या डाॕ.फपाळ यांना शोधण्यासाठी कोल्हापुर येथील जवान ही  पाण्यात बेपत्ता झाला होता. एनडीआरएफ च्या या जवानाचा तळ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला असून शोध पथकाने सर्च ऑपरेशन करून हे दोन्ही मतादेह शोधण्याचा प्रयत्न केला असता या जवानाचा मृतदेह  सापडला आहे. बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे स्वतः घटनास्थळी तळ ठोकून आहेत. 

        धारूर तालुक्यातील तेलगाव येथील डॉ फपाळ हे माजलगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेले असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजे दरम्यान घडली.

संबंधित बातमी:माजलगाव धरणात डॉक्टर बुडाला

धारूर तालुक्यातील तेलगाव येथे रुग्णसेवा देणारे डॉ. दत्ता फपाळ वय 40 वर्ष (रा.बेलुरा ता.माजलगांव)मयत डॉक्टरचे नाव असून ते सकाळी मित्रांसमवेत माजलगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान तळ्यात पाणी जास्त असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. पाणि जास्त प्रमाणात असल्याने प्रेत अद्याप सापडलेले नाही.

   डॉ. फपाळ यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी बीड, परळी, येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करीत होते. आज त्यांच्या मदतीला कोल्हापूर येथील एनडीआरएफची टीम धावून आली. या टिमने शोधकार्य सुरू केले. मात्र धरणात मच्छिमारांनी लावलेल्या जाळ्यात अडकून टीममधील दोन सदस्य पाण्याखाली अडकून पडले. त्यांना बाहेर काढताना झालेल्या खेचाखेचीत राजू मोरे यांचा ऑक्सिजन सिलींडर निसटून वर आला. साधारण 45 मिनिटांपासून त्यांचाही शोध बचाव पथकातील कर्मचारी घेत आहेत. तर दुसऱ्या एका शुभम काटकर या कर्मचाऱ्याला 15 मिनिटानंतर बीडच्या बचाव पथकाने वर काढले. त्याच्यावर माजलगावच्या देशपांडे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनास्थळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, उपविभागीय अधिकारी निलम बाफना, तहसीलदार वर्षा मनाळे, मुख्याधिकारी विशाल भोसले, माजलगाव शहर पोलीस ठाण मांडुुन आहेत.

संबंधित बातमी:● *धक्कादायक: माजलगाव धरणात बुडालेल्या डाॕक्टरचा शोध घेणाऱ्या पथकातील जवान पाण्यात बेपत्ता*

   दरम्यान इंडिया पथकातील बेपत्ता झालेले जवान राजू मोरे वय 28 राहणार कोल्हापूर हे पाण्यात बेपत्ता झाले होते. त्याचा बराच वेळ शोध घेतल्यानंतर मृत देह आढळून आला आहे. हा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

टिप्पण्या

  1. माणसाचे मोडलेले हाड चा व्हिडीओ होतो तर पाण्यातील सर्व गोष्टी दिसायला पाहिजेत .

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!