MB NEWS-शेतकऱ्यांच्या जनआक्रोश धरणे आंदोलनात शासनावर अजय मुंडेंचा हल्लाबोल

 शेतकऱ्यांच्या जनआक्रोश धरणे आंदोलनात शासनावर अजय मुंडेंचा हल्लाबोल



_......तर येणाऱ्या काळात आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांसह जेलभरो करू!_


बीड, प्रतिनिधी ता. 16...... बीड जिल्ह्यातील हजारो शेतकरी आज सर्वपक्षीय जनआक्रोश धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.  बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अग्रीम पीकविमा, अनुदान, जनावरांच्या लम्पी आजारावर मुबलक लशींची उपलब्धी व्हावी आदी मागण्यांसाठी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करण्यात आले. बीड जिल्ह्यातील हजारो शेतकरी बांधव या जनआक्रोश आंदोलनात सहभागी झाले होते. या सर्वपक्षीय शेतकऱ्यांच्या जनआक्रोश आंदोलनात युवक नेते श्री. अजय मुंडे यांनी आपली भूमिका मांडली.


त्यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा पाढा वाचत प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला, मागील वर्षी आ. धनंजय मुंडे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना ज्याप्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रीम विमा मदत देण्यात आली, त्याप्रमाणे याही वर्षी विमा लागू असलेल्या सर्व पिकांना अग्रीम मदत द्यायला हवी होती पण ती देण्यात आली नाही. शेतकऱ्यांवार अस्मानी संकट कौसळलेलं असताना राज्यातील सुलतानी राजवटीची वागणूक बेजवाबदारपणाची असल्याचे श्री. मुंडे म्हणाले.


शेतकऱ्यांच्या या जनआक्रोश आंदोलनाची दखल राज्यसरकारला घ्यावी लागेल अन्यथा येणाऱ्या काळात आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांसह जेलभरो आंदोलन करून आ.मुंडेच शेतकऱ्यांना मदत देण्यास राज्य सरकारला भाग पाडतील, असा विश्वासही यावेळी श्री. अजय मुंडे यांनी बोलून दाखवला.


यावेळी बीडचे जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन बीड जिल्ह्यातील सर्व आमदार लोकप्रतिनिधी, शेतकरी बांधव, शेतकरी एकजूट संघर्ष समिती व सर्व शेतकरी संघटना यांच्या उपस्थितीत देण्यात आले. या जनआक्रोश धरणे आंदोलनात मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव सहभागी  झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार