MB NEWS-सलग नऊ वेळा खासदार, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

 सलग नऊ वेळा खासदार, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन



नंदुरबार : माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. नाशिकमध्ये खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माणिकराव गावित नंदुरबारमधून  सलग नऊ वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. शनिवार, १७ सप्टेंबर सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी त्यांनी जगाचा निरोप घेतला. ते कार्यकर्त्यांमध्ये 'दादासाहेब' म्हणून लोकप्रिय होते. माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावित यांनी ट्विटरवरुन वडिलांच्या निधनाची दुःखद बातमी दिली आहे.

माणिकरावांनी १९६५ मध्ये ग्रामपंचायतीपासून राजकारणाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर केंद्रीय गृह राज्यमंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री अशी पदं न मागताच मिळाली. संसदेतील सर्वात ज्येष्ठ खासदार म्हणून त्यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्षपदही भूषवले होते. १९८१ मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा लढवली व विजयीही झाले. त्यानंतर त्यांनी सलग नऊ वर्ष विजयी टिळा मिरवला.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघ आणि काँग्रेस हे एक समीकरण तयार झालं होतं. परंतु काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबारमध्ये २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत माणिकराव गावितांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांचे सुपुत्र भरत गावित  यांनी आपल्यासाठी लोकसभेची उमेदवारी मागितली होती. मात्र काँग्रेसने के. सी. पाडवी यांना तिकीट दिले. त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भरत गावित यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर कन्या निर्मला गावित यांनी शिवबंधन हाती बांधले.

खरं तर माणिकराव गावित दहाव्यांदा विजयी झाले असते, तर लोकशाहीप्रधान देशात सलग दहा वेळा संसदेचे सदस्य म्हणून निवडून येण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावे जमा झाला असता, परंतु मोदी लाटेत त्यांना पराभवाचा धक्का बसला आणि वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा मान हुकला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !