युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-पंतप्रधान मोंदींच्या वाढदिवसानिमित्त पंकजाताई मुंडे यांचा स्त्युत्य संकल्प*

 *टीबी रूग्णांच्या सेवेसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान सरसावले!*



*दोन रूग्ण दत्तक घेऊन उपचाराची संपूर्ण काळजी घेणार* 


*पंतप्रधान मोंदींच्या वाढदिवसानिमित्त पंकजाताई मुंडे यांचा स्त्युत्य संकल्प*


परळी ।दिनांक १७। 

समाजातील वंचित, पिडित व गरजू लोकांना नेहमीच मदतीचा हात देणाऱ्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने आता टीबी रूग्णांच्या सेवेसाठी पुढाकार घेतला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी टीबीचे दोन रूग्ण दत्तक घेऊन त्याच्या उपचाराची संपूर्ण काळजी घेणार असल्याचा स्त्युत्य संकल्प   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर केला आहे.


   यासंदर्भात पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की,सेवा पंधरवाडाच्या निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या जन्म दिवस १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहेत. हे कार्यक्रम अत्यंत साधेपणाने व्हावेत अशी अपेक्षा आहे. आज आदरणीय मोदीजीनां वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा देत असताना त्यांनी जो मार्ग आम्हाला दिला आहे, त्याप्रमाणे आज टी. बी. चे दोन पेशंट दत्तक घेत आहे. याप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या १७ तारखेला कोणत्याही प्रकारचे टी.बी. चे दोन पेशंट गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान दत्तक घेईल आणि त्यांच्या उपचाराची सर्वोतोपरी काळजी घेण्यात येईल. पुढील १५ दिवस इतर अनेक सामाजिक उपक्रम करण्यात येणार आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या