गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने घुले कुटुंबास पाच लाखाची मदत जाहीर

इमेज
  ना. पंकजा मुंडे यांनी मयत विलास घुलेंच्या परिवाराचे स्वीकारले पालकत्व ; दुःखात आणि न्यायाच्या लढाईतही पाठिशी बीड दि. २३ -- टाकळी- कदमवाडी (ता. केज) परिसरात झालेल्या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या विलास घुले यांच्या परिवाराचे पालकत्व स्वीकारत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे. मयत घुले यांच्या पत्नीस गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने पाच लाख रूपयांची मदत आज त्यांनी जाहीर केली आहे.    विलास घुले याच्या हत्येच्या प्रकरणात झालेल्या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध करत ना. पंकजा मुंडे यांनी पोलिस प्रशासनाला दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, पण कोवळ्या वयात काहीही संबंध नसताना त्याचा हकनाक मृत्यू झाल्यामुळे त्याचे कुटुंब उघड्यावर पडले असून त्यांचेवर अकाली संकट आले आहे. विलास यांचे बंधू रमेश यांच्याशी ना. पंकजाताईंनी संपर्क साधून आपण विलासच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले. तुमच्या दुःखात आणि न्यायाच्या लढाईत मी  परिवाराच्या पाठिशी  ठामपणे उभी असल्याचे सांगितले. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातू...

MB NEWS-सिरसाळ्यात ट्रक चोरी तर परळीत घरफोडीची घटना

 सिरसाळ्यात ट्रक चोरी तर परळीत घरफोडीची घटना



परळी वैजनाथ ,प्रतिनिधी...

 परळी शहर व तालुक्यात चोरीचे सत्र अखंडितपणाने सुरूच आहे. दररोज कुठे ना कुठे चोरीच्या घटनांची नोंद पोलीस ठाण्यात होत आहे. वाढत्या चोऱ्या हा नागरिकांच्या चिंतेचा विषय बनलेला आहे. सिरसाळा येथे ट्रकचोरीची तर परळी शहरात घरफोडीची घटना नोंद झाली आहे.

       याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, सिरसाळा जवळील एका पेट्रोल पंपा समोर लावलेली फिर्यादी वाजेखान सादत खान पठाण या वीट भट्टी व्यवसायिकाची लाल भगव्या रंगाची जुनी वापरती ट्रक कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.या ट्रकची अंदाजे किंमत दोन लाख वीस हजार आहे .याप्रकरणी सिरसाळा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोह शेंगळे हे करत आहेत. तर दुसरी घटना परळी शहरात घडली असून फिर्यादी शांताबाई केशवराव वाघमारे राहणार हबीबपुरा यांच्या घरात अज्ञात चोरट्याने दाराची कडी व कुलूप तोडण्याचा प्रयत्न करून घराचे पत्रे उचकवून आत प्रवेश केला व घरातील सोन्याचे लॉकेट कानातील झुंबर जोड नगदी असा एकूण 73 रुपयाचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोह शिंदे हे करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या