युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS- *कै. ल .दे .महिला महाविद्यालयात झाला श्री.अमित जोशी यांचा 'अ-अभिनयाचा' हा भन्नाट कार्यक्रम

 *कै. ल .दे .महिला महाविद्यालयात झाला श्री.अमित जोशी यांचा 'अ-अभिनयाचा' हा भन्नाट कार्यक्रम 





परळी , दि. 15/9/20022 (प्रतिनिधी)  

येथील कै. ल .दे . महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी  व त्यांच्या अभिनय कौशल्य विकासासाठी श्री अमित प्रतिमा नागराज जोशी यांच्या ' अ - अभिनयाचा ' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत त्यांनी विद्यार्थिनींना अभिनयाचे तंत्र व सादरीकरण व प्रभावी अभिनय याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष अभिनयाच्या माध्यमातून सलग दीड तास हसवत हसवत केलेले मार्गदर्शन अतिशय उच्च पातळीवरचे होते. अभिनयाच्या माध्यमातून प्रभावी रसाविष्कार कसा करता येतो. हे त्यांनी प्रत्यक्ष सादरीकरणातून दाखविले. यावेळी कार्यक्रमाविषयी प्रतिक्रिया देताना प्रा.प्रसाद देशमुख यांनी 'अ - अभिनया ' सारखे कार्यक्रम विद्यार्थिनीमध्ये अभिनय कौशल्य रुजविण्यासाठी आवश्यक आहेत. असे मत मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष संजय देशमुख हे होते . तर प्रमुख अतिथी म्हणून कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख , संचालिका डॉ. विद्याताई देशपांडे -देशमुख , प्राचार्य डॉ .एल. एस . मुंडे हे उपस्थित होते . सांस्कृतिक व विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात प्रा. कल्याणकर आर.बी . , प्रा . देशपांडे के .बी . , प्रा .डॉ . पी.व्ही . गुट्टे , प्रा .अरुण चव्हाण ,प्रा.डॉ.कवडे विवेकानंद ,प्रा.डॉ. श्याम नेरकर ,प्रा.अशोक पवार , प्रा . डॉ . जोशी आर .एल. , प्रा. आर . बी . शहाणे , प्रा . रोकडे मॅम , प्रा. डॉ. वर्षा मुंडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन प्रा.डॉ.राजकुमार यल्लावाड यांनी  तर आभार प्रकटन प्रा.डॉ .पी .व्ही .गुट्टे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या