MB NEWS-जि.प.शाळेतील ७० मुलींची हिमोग्लोबीन तपासणी पोषण आहार माह अंतर्गत स्तुत्य उपक्रम!

 जि.प.शाळेतील ७० मुलींची हिमोग्लोबीन तपासणी



पोषण आहार माह अंतर्गत स्तुत्य उपक्रम!


सिरसाळा (प्रतिनिधी)  पोषण आहार माह अंतर्गत पं.गुरु पार्डीकर महाविद्यालय, गृह विज्ञान विभाग व जि प कें. प्रा शाळा सिरसाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आज जि प के प्रा शाळेतील इ. सहावी ते आठवीच्या  मुलींची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.

    शालेय पोषण आहार माह अंतर्गत पं.गुरु पार्डीकर महाविद्यालय गृह विज्ञान विभागाच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे, याचाच एक भाग म्हणून जि.प.के.प्रा शाळेतील विद्यार्थ्यांना संतुलित व सकास आहारा संदर्भात प्रा .डॉ. उषा माने प्रा.डॉ. अरुणा वाळके व जि प. शाळेतील सांस्कृतिक विभाग प्रमुख लक्ष्मण वैराळ यांनी मार्गदर्शन केले .व त्यानंतर दुपारच्या सत्रात प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.राधाकिशन राऊत, संदिप लांडगे, गौतम पोटभरे, नंदकुमार सोळंके यांच्या टीमने इ. सहावी ते आठवीच्या वर्गातील 70 विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन चाचणी करण्यात आली

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एम एम घोडके, शा.व्य.स.अध्यक्ष नासर दादा शेख केंद्रप्रमुख गंगाधर कांबळे आदींची उपस्थिती होती

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  शिक्षक राम कडभाने ,नारायण जाधव ,डीडी पवार, महादेव राजमाने , संतोष अरबुणे, महादेव राजमाने, उषा देशमुख,लता चोपडे, मंगल माळी, कल्पना मुंडे, रोहिणी फड आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार