पोस्ट्स

MB NEWS:घाटनांदुर, निरपना, बागझरी, सोमनवाडीत जलजीवन मिशनच्या १४ कोटीच्या कामाचा थाटात शुभारंभ

इमेज
  विकासाबरोबरच मतदारसंघात मला चांगली संस्कृती रूजवायचीयं - पंकजाताई मुंडे *तुमची सेवा करणं माझं कर्तव्यच,  मला ओटीत घ्या ; गावोगावी  लक्ष्मी नांदल्याशिवाय राहणार नाही* *घाटनांदुर, निरपना, बागझरी, सोमनवाडीत जलजीवन मिशनच्या १४ कोटीच्या कामाचा थाटात शुभारंभ*  *ग्रामस्थांकडून  लेकीचे जल्लोषात स्वागत ; गावागावात दिवाळी !* *माझा विरोध व्यक्तीला नाही तर प्रवृत्तीला ; सत्तेला अहंकाराची बाधा आली की गर्वाचं घर खाली होतं* अंबाजोगाई  ।दिनांक ०५। राजकारणात माझा कोणा व्यक्तीला विरोध नाही तर प्रवृत्तीला आहे.  राम, अर्जुनासारख्या प्रवृत्ती समाजाचं भलं करत असतात, धर्माची स्थापना करत असतात. याऊलट रावण अहंकारी होता, अगदी तसंच राजकारणात जेव्हा सत्तेला अहंकाराची  बाधा होते तेव्हा गर्वाचं घर खाली होतं हे लक्षात  घेतलं पाहिजे.   केवळ विकासच नाही तर परळी मतदारसंघात मला चांगली संस्कृती रूजवायचीयं. तुमची सेवा करणं माझं कर्तव्यच आहे, त्यासाठी आता तुम्हीच मला दत्तक घ्या, गावोगावी विकासाची लक्ष्मी नांदल्याशिवाय राहणार नाही असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलं.    घाटनांदुर, सोमनवाडी, निरपन

MB NEWS:घृणास्पद घटना :सहा वर्षाच्या चिमुकलीवर ६० वर्षाच्या वृद्धाने केला अत्याचार

इमेज
घृणास्पद घटना :सहा वर्षाच्या चिमुकलीवर ६० वर्षाच्या वृद्धाने केला अत्याचार अंबाजोगाई - तालुक्यातील एका सहा वर्षीय बालिकेला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून ६० वर्षीय वृद्धाने अत्याचार केल्याची निंदनीय घटना समोर आली आहे. याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्या वृद्धाला पोलिसांनी तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. पिडीत अल्पवयीन बालिका सध्या अंबाजोगाई येथील एका शाळेत पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि.०२) शाळेतून घरी आल्यानंतर ती खेळण्यासाठी गेली. त्यानंतर रात्री ती कोणासही काहीही न बोलता एकटीच शांत बसली. त्यामुळे आई-वडिलांनी तिला विचारले असता पोट दुखत असल्याचे तिने सांगितले. दुसऱ्या दिवशी शाळेतून आल्यानंतरही तिचे पोट दुखत होते. त्यामुळे वडिलांनी तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने सांगितले की, गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ती मैत्रिणीसोबत खेळत असताना विष्णू बाबुराव सादुळे (वय ६०) हा तिथे आला. चल तुला चॉकलेट देतो असे आमिष दाखवून तो तिला जुन्या घरात घेऊन गेला. तिथे नराधम विष्णूने त्या सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला आण

MB NEWS:महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची जिल्हा आढावा बैठक संपन्न, नवीन नियुक्त्या

इमेज
  महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची जिल्हा आढावा बैठक संपन्न, नवीन नियुक्त्या परळी वैजनाथ दि.05          येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन शनिवारी (दि.०४) सायंकाळी करण्यात आले होते. बैठकीस जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच बैठकीत मान्यवरांच्या हस्ते अनेक नवीन नियुक्त्या करण्यात आल्या.                    महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने येथील श्री.शनी मंदिराच्या सभागृहात जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीस महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे महासचिव डॉ भूषण कर्डिले, (नाशिक) राज्य कोषाध्यक्ष गजानन शेलार, ठाणे विभागाध्यक्ष सुनील चौधरी, जिल्हा अध्यक्ष संगमेश्वर फुटके, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष राधाताई फकिरे, जिल्हा सचिव प्रा.मधुकर शिंदे, युवक आघाडीचे संभाजीनगर कार्याध्यक्ष अतुल बेंडे, कार्याध्यक्ष प्रा.प्रविण फुटके सह तालुका, शहरचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्

MB NEWS:लाख बोलक्याहून थोर एकची कर्तबगार: ओमप्रकाश सारडा

इमेज
  लाख बोलक्याहून थोर एकची कर्तबगार: ओमप्रकाश सारडा परळी । प्रतिनिधी परळी शहरातील गेल्या तीस वर्षांपासून राजकारणात असणारे ओमप्रकाश सारडा व महेश बँकेचे संचालक गेल्या 20 वर्षांपासून, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना रोटरी क्लबचे अध्यक्ष या पदावर राहून काम केल्याबद्दल 2001 वर्षात पुरस्कार मिळाला होता. तो पुरस्कार ओमप्रकाश सारडा यांना महाबळेश्वर येथे देण्यात आला. तसेच राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात रहात असताना राजकारणात सक्रीय राहून नगरसेवक, धार्मिक क्षेत्रात प.पू.प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा असो किंवा गिरीशबापू यांची शिवकथा तसेच या कथेमध्ये प्रामुख्याने भाग घेवून शेवटपर्यंत सात दिवस राहून येणार्‍या अडचणीवर मात करत सिंहाचा वाटा घेतल्याबद्दल ओमप्रकाश सारडा यांची निवड केल्याबद्दल  मराठवाडा साथीच्या वतीने पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारामुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. आज रविवारी माहेश्वरी समाज भुषण पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदीर येथे पुरस्कार देण्यात येणार आहे. मारवाडी युवामंचद्वारे महाराष्ट्र प्रदेश बॉडीवर काम करून अखिल भार

MB NEWS:■ शेतकरी कीर्तन महोत्सवात शेतक-यांची भाकर; जाती-धर्माचा विसर होऊन होतोय ऐक्याचा जागर

इमेज
  ■ शेतकरी कीर्तन महोत्सवात शेतक-यांची भाकर; जाती-धर्माचा विसर होऊन होतोय ऐक्याचा जागर परळी / प्रतिनिधी चौदा गावातील शेतकरी, कष्टक-यांनी एकत्र येऊन जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या बीजेनिमित्त परळी-धारूर सीमेवर असलेल्या कांनापूर येथे होत असलेल्या शेतकरी कीर्तन महोत्सवात  रोजी दुपारी आणि संध्याकाळी होत असलेल्या पंगतीसाठी गावागावातून, घराघरातून एका हाके सरसी भाकरीचा ओघ येऊ लागला आहे. सर्व भाकरी भोजन मंडपात उतरवल्या जातात तेव्हा कार्यकर्ते कौतूकाने त्याकडे पाहू लागले आहेत.गावातील प्रत्येक घराघरातून आलेल्या भाकरींची आता ओळख पुसली गेली असून ती भाकरी कोणत्या घरातून आली, ते घर कोणत्या जातीचं होतं, कोणत्या धर्माचं होतं. हे आता कुणालाच ओळखता येत नव्हतं. या भाकरी कोणत्याही घरातून आलेल्या असल्या तरी शेतक-यांनी पिकवलेल्या धान्याच्या आहेत,ही जाणीव प्रत्येकालाच या नाविन्यपूर्ण व समाज परिवर्तनासाठी क्रांतिकारी ठरत असलेल्या शेतकरी कीर्तन महोत्सवात प्रकर्षाने दिसून येत आहे. सध्या समाजात कीर्तन सोहळे हे लाखो रुपये खर्च करून एखाद्या इव्हेंट साजरा करावा असे होतात.भली मोठी बिदागी देऊन फक्त मनोरंजन करून आयोज

MB NEWS: ✍️ सरला हिरेमठ लिखित जयंती विशेष लेख:श्री श्री श्री १००८ जगदगुरू रेणुकाचार्य

इमेज
  जयंती विशेष: श्री श्री श्री १००८ जगदगुरू रेणुकाचार्य आ ज दिनांक ५ मार्च २०२३, फाल्गुन शुद्ध त्रयोदशी, श्री  जगद्गुरु रेणुकाचार्य यांची जयंती आहे. ही जयंती सर्व वीरशैव  बांधव आपापल्या परंपरागत पद्धतीने साजरी करतात. वीरशैव  हा अतिप्राचीन धर्म आहे. वीरशैव  मध्ये स्थावर लिंग पूजेला मान्यता नसून ,इष्टलिंग पूजेला महत्त्व आहे .  "यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवति भूतले! तदा तदा $ व तारो S ये गणेशस्य महीतले !! "   स्कन्द पुराणातील या प्रमाणं वचनानुसार धर्माला ग्लानि आल्यानंतर भगवान शिव आपल्या विशेष अंशातून, शिवगणाच्या  रूपात अवतरीत होऊन प्रत्येक युगाच्या आरंभी धर्म  स्थापना करतात .शिवाच्या आज्ञेने पंचशिव गणांनी लिंगातुन प्रादुर्भूत होऊन या धर्माची प्रतिष्ठापना केली ,असे परंपरा मानते .हेच पंच शिवगण म्हणजेच पंचाचार्य असून, हेच वीरशैव धर्माचे संस्थापक होत .पंचाचार्यानी  रंभापुरी, उज्जैनी ,केदार ,श्रीशैल व काशी क्षेत्र येथे पंच पीठाची स्थापना केली .ही वीरशैवाची राष्ट्रीय महा पीठे होत. पंचाचार्याच्या या दिव्य परंपरेतील श्री जगद्गुरु रेणुकाचार्य हे रंभापुरी पीठाचे आचार्य होत.   श्री जगद्ग

MB NEWS:नांदेडचे लोन बीडपर्यंत राष्ट्रवादीचे आमदार केसीआर यांच्या भेटीला

इमेज
 आ. प्रकाश सोळंके यांनी घेतली तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची भेट  ------ माजलगाव - मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी हैद्राबाद येथे तेलंगाणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची भेट शुक्रवारी भेट घेतल्याचे समोर आले आहे. या त्यांच्या भेटीमुळे राज्यात मोठी राजकीय खळबळ उडाली असून आ.सोळंके मागील काही महिन्यापासून के.सी.आर. यांच्या पक्षात जाण्याच्या सूचक वक्तव्याला दुजोरा मिळत आहे. आमदार प्रकाश सोळंके हे मागील दोन तीन महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार अशा चर्चा होती. त्यातच एका पत्रकार परिषदेत ही त्यांनी मी भाजप, शिंदे गट किंवा तेलंगाणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या पक्षात जाऊ शकतो असे सांगितले होते. त्यातच शुक्रवारी आमदार सोळंके यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची हैद्राबाद येथे भेट घेतल्याचे समोर आले आहे. यामुळे आमदार प्रकाश सोळंके हे आत्ता के.सी.आर. यांच्या पक्षात जाणार का ? कधी प्रवेशाचा मुहूर्त काढणार या ना अनेक चर्चा होऊ लागल्या आहेत. आमदार सोळंके यांची फेसबुक पोस्ट  प्रकाश सोळंके यांनी त्यांच्या सोश

MB NEWS: अभिष्टचिंतन:परळीतील आजातशत्रू व्यक्तिमत्व तथा वृक्षमिञ गोविंद (भैया) चांडक....!

इमेज
  परळीतील आजातशत्रू व्यक्तिमत्व तथा वृक्षमिञ गोविंद (भैया) चांडक....!       आ पल्या प्रमाणिक मेहनतीच्या जोरावरती इच्छित यश प्राप्त करता येते मग क्षेत्र कुठलेही असो ते क्षेत्र सामाजिक असेल किंवा उद्योजकीय असेल मनापासून केलेल्या कृतीमुळे किंवा कार्यामुळे कोणत्याही क्षेत्रात प्राविण्य व नावलौकिक मिळवता येतो. निष्ठा, सातत्य, कष्ट करण्याची तयारी व आपल्या कामाप्रती प्रामाणिक हेतू जपत आपणही समाजाप्रती काही देणे लागतो या उदात्त भावनेतून आपल्या व्यवसायाच्या रहाटगाड्यातून वेळ काढत समाजासाठी शक्य होईल तेवढी मदत तथा कार्य करणारे व वृक्ष संगोपनासाठी अविरत कार्य करणारे वृक्षमित्र तथा परळी शहरामध्ये भैय्या या नावाने सर्व सुपरिचित तथा अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक कार्यकर्ते श्री गोविंद (भैया) चांडक हे होय.     आज आपण जाणून घेणार आहोत परळीच्या मध्यवर्ती बाजारपेठेतील यशस्वी उद्योजक, मयुरी मल्टी सर्विस व झेरॉक्सचे संचालक तथा प्रमाणिक व सर्वसुपरिचित व्यक्तिमत्व असणाऱ्या गोविंद(भैया) बालाप्रसाद चांडक यांच्या विषयी. परळी शहरातील नावाजलेल्या पद्मावती भागात राहणारे गोविंद भैया चांडक हे उच्चशिक्षित अ

MB NEWS:मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा परळीत तीव्र निषेध-वैजनाथ कळसकर

इमेज
  मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा परळीत तीव्र निषेध-वैजनाथ कळसकर परळी वैजना, मनसेच्या वतीने मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर आज दि. ०3 मार्च रोजी मुंबई दादर शिवाजी पार्क येथे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेले असतांना त्यांच्यावर अज्ञात ४ते ५ जणांनी हल्ला केला . या हल्ल्यात संदीप देशपांडे जबर जखमी झाले. या भ्याड हल्ल्याचा तिव्र निषेध करत परळी वैजनाथ येथे मनसेच्या वतीने निदर्षने करण्यात आली तसेच उपजिल्हाधीकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांसह, ग्रहमंत्री देवेंद्र फडणविस यांना निवेदन पाठवुन सदरील हल्ल्याची पुर्ण चौकशी करून हल्लेखोरांना तत्काळ अटक करून हल्ल्यामागील गुन्हेगारांवर कडक कायदेशीर कार्यवाही करावी, या ह्ल्ल्याचा मास्टरमाईंड शोधुन काढावा, संदीप देशपांडे यांना पोलीस संरक्षण सुरक्षा पुरवावी आदी मागण्या करण्यात आल्या या वेळी मनसेचे पदाधीकारी ता.अध्यक्ष श्रीकांत पाथरकर, शहरअध्यक्ष वैजनाथ कळसकर ता. उपाध्यक्ष विठ्ठल दादा झीलमेवाड श.उपाध्यक्ष प्रशांत कामाळे, ऋषिकेश बारगजे, मनविसे शहरअध्यक्ष हनुमान सातपुते, माणिक लटिंगे,अशोक सुरवसे,विजय बकरे आदींसह महाराष्ट्

MB NEWS:सरस्वती नदीशेजारील रस्त्यावरील ढाप्याचे काम करा-सुशील हरंगुळे

इमेज
  सरस्वती नदीशेजारील रस्त्यावरील ढाप्याचे काम करा-सुशील हरंगुळे परळी वैजनाथ अंबेवेस भागातील सरस्वती नदीशेजारील रास्तवरील ढाप्याचे काम करण्यासाठी मागील 4 दिवसांपासून खोदून ठेवल्यामुळे नागरिकांना अडचण निर्माण झाली आहे. हा ढापा त्वरित तयार करून रस्ता पूर्ववत न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा भाजपा युवक नेते सुशील हरंगुळे यांनी दिला आहे. मिलिंद विद्यालयासमोरून अंबेवेस कडे येणारा रस्ता हा मोठ्या प्रमाणात रहदारीचा आहे. वैद्यनाथ मंदिर, नेहरू चौक, मोंढ्याकडे जाण्यासाठी या रस्त्याचा प्रामुख्याने उपयोग होतो. भाजी मंडई या रोड वर असल्याने अनेक शेतकरी या रस्त्याचा उपयोग करतात. दहावी बारावीच्या परीक्षा चालू असल्याने विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण झाली आहे हा रस्ता तीन वेळा केला गेला व बिले उचलली गेली. परंतु केलेल्या बोगस कामांमुळे दोन वेळा केलेला ढापा पडला आहे. मागील चार दिवसांपासून पुन्हा ढाप्याचे काम करण्यासाठी तिसऱ्या वेळेस रस्ता खोदून ठेवला आहे.  या ढाप्याचे काम त्वरित पूर्ण करून रस्ता पूर्ववत चाली करावा अन्यथा नगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपा युवक नेते सुशील हरंगुळे यांनी

MB NEWS:पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत कौडगाव हुडयाच्या सरपंच लताबाई रंजवे भाजपात

इमेज
  पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत कौडगाव हुडयाच्या सरपंच लताबाई रंजवे भाजपात _भाजपचा गमचा घालून केले पक्ष प्रवेशाचे स्वागत_ परळी वैजनाथ । दिनांक ०४। कौडगाव हुडा येथील सरपंच लताबाई संभाजी रंजवे यांनी आज भाजपात प्रवेश केला. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी भाजपचा गमचा घालून त्यांच्या प्रवेशाचे स्वागत केले.   नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत लताबाई रंजवे हया अपक्ष म्हणून उभ्या होत्या. ग्रामस्थांच्या विश्वासाच्या बळावर त्या  सरपंच म्हणून निवडून आल्या. पंकजाताई मुंडे यांचे नेतृत्व मान्य करत गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण भाजपात प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, रमेशराव कराड, नितीन ढाकणे, पप्पू चव्हाण यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री दिलीप राठोड, कलावती पवार, कौसाबाई चव्हाण, बालासाहेब राठोड आदी उपस्थित होते. ••••

MB NEWS:जनतेच्या विकास अन् सुख-शांतीला नख लावण्याचा प्रयत्न सहन करणार नाही

इमेज
 परळीला भूषण वाटेल असेच काम माझ्या हातून होईल ; तुम्ही साथ द्या, मतदारसंघाची पुन्हा नव्याने बांधणी करू पंकजाताई मुंडेंच्या हस्ते लोणी, कौठळीत झाले जलजीवन मिशनच्या ६ कोटीच्या कामाचे थाटात भूमिपूजन सत्ता असताना एक वीटही लावता आली नाही, आता श्रेय घेण्यासाठी मात्र आटापिटा जनतेच्या विकास अन् सुख-शांतीला नख लावण्याचा प्रयत्न सहन करणार नाही परळी वैजनाथ ।दिनांक ०४। लोकनेते मुंडे साहेबांनी इथल्या लोकांसाठी चाळीस वर्षे खस्ता खाल्ल्या, त्यांना जावून आज नऊ वर्षे झाली पण आजही परळी त्यांच्याच नावानं ओळखली जाते कारण त्यांनी इथल्या लोकांचा सन्मान वाढवण्याचं काम केलं, अगदी तसंच काम माझ्या हातून होईल. माझ्या परळीची मान मी  कधीही खाली जावू देणार नाही असं सांगत आता तुम्हीच मला दत्तक घ्या, तुमच्या साथीने मतदारसंघ पुन्हा नव्याने बांधू अशी साद भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी जनतेला घातली.    सत्ता हातात असताना ज्यांना गावच्या विकासाची एक वीटही लावता आली नाही ते आता भाजपच्या सत्तेत आम्ही मंजूर केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी मात्र पुढे येत आहेत. जनतेच्या विकासाला आणि सुख-शांतीला नख लावण्याचा प्र

MB NEWS:केज-बीड रोडवर अपघातात माजी नगरसेवकाचा मृत्यू ; एक पोलीस कर्मचारी जखमी

इमेज
  केज-बीड रोडवर अपघातात माजी नगरसेवकाचा  मृत्यू ; एक पोलीस कर्मचारी जखमी केज :- केज-बीड रोडवर कोरेगाव जवळ अपघातात कार पलटी होऊन अपघात झाला. त्या अपघातात माजी नगरसेवक गजमफर उर्फ पप्पू (आण्णा) इनामदार यांचा मृत्यू झाला. तर पोलीस जमादार सय्यद चाँद हे जखमी झाले आहेत. या बाबतची माहिती अशी की, दि २ मार्च रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास माजी नगरसेक तथा विद्यमान नगरसेविका इनामदार यांचे पती गजमफर उर्फ पप्पू अण्णा इनामदार आणि केज पोलिस ठाण्यातील पोलीस जमादार सय्यद चाँद हे दोघे स्विफ्ट डिझायर क्र (एम एच ०४/ ई एफ ७५५७) गाडीने बीडच्या दिशेने जात असताना केज-बीड रोडवर कोरेगाव जवळील तांदळे वस्ती जवळ समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना कार रस्त्याच्या खड्ड्यात जाऊन ती पलटी झाली. त्यात गजमफर उर्फ पप्पू आण्णा इनामदार यांच्या डोक्याला गंभीर मार लागला त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या सोबत असलेले पोलीस कर्मचारी सय्यद चाँद हे जखमी झाले असून जखमी पोलीस कर्मचारी सय्यद चाँद यांना बीड येथील दवाखान्यात दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळताच केजचे नगरसेवक अझरोद्दीन इनामदार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन

MB NEWS:शेतकरी कीर्तन महोत्सव हे क्रांतिकारी पाऊल-शेतकरी कवी इंद्रजित भालेराव

इमेज
  शेतकरी कीर्तन महोत्सव हे क्रांतिकारी पाऊल-शेतकरी कवी इंद्रजित भालेराव परळी / प्रतिनिधी शेतक-यांना न मागता कर्जमुक्ती देणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या बीजेनिमित्त कान्नापूर ता:धारुर जि. बीड या ठिकाणी दि.०३ मार्च ते दि. ०९ मार्च हे सात दिवस परिसरातील चौदा गावांनी मिळून शेतकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कीर्तन महोत्सवाची सुरवात०३ मार्च रोजी आयुष्याभर शेतक-यांच्या व्यथा-वेदना कवितेतून मांडणारे प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव, वारकरी कीर्तन परंपरेचा अविभाज्य भाग असणाऱ्या पखवाज या  वाद्याला अंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून देणारे उद्धवबापू आपेगावकर यांच्या उपस्थितीत झाली. या सोहळ्याला संबोधित करताना वरील उद्गार इंद्रजीत भालेराव यांनी काढले. 900 वर्षांपूर्वी ज्या उद्देशाने वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली तो उद्देश आता मात्र बाजूला राहून त्याची जागा दांभिकता, कर्मकांड आणि पाखंडाने घेतलेली आहे; म्हणून समाजातील जागरूक व्यक्तींनी पुढाकार घेऊन अशा कीर्तन महोत्सवाचे आयोजन करणे हा एक क्रांतिकारक उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. हे सांगतानाच त्यांनी संत नामदेवापासून, बसवेश्वर, चक्रधर ते स

MB NEWS:अनावश्यक खर्च टाळून गोरगरीब रूग्णांसाठी मोफत आरोग्य शिबिरं घेणं केव्हाही चांगलं

इमेज
  अनावश्यक खर्च टाळून गोरगरीब रूग्णांसाठी मोफत आरोग्य शिबिरं घेणं केव्हाही चांगलं पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते  माजलगांवात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं  उदघाटन  शिबिरातील रूग्णांना दिल्या सुदृढ आरोग्याच्या शुभेच्छा माजलगांव ।दिनांक ०३। आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या वातावरणात आरोग्याचा  विषय गंभीर बनला आहे. प्रत्येक जण आरोग्याविषयी जागृत झाला आहे. गोर गरीबांना महागडे उपचार घेणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते त्यामुळे अशा शिबीराचा त्यांना उपयोग होतो.  वाढदिवस, समारंभावर अनावश्यक खर्च टाळून अशी शिबीरं जास्तीत जास्त घेतली जावीत, त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा  असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी येथे केले. डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील हाॅस्पीटल अहमदनगर आणि विजया अर्बन मल्टिस्टेट माजलगांव यांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे उदघाटन पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते  आज झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.  केले. माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, आर टी देशमुख, मोहनराव जगताप, रमेश आडसकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, अरूण बर

MB NEWS:दीनदयाळ बँकेला 100 ते 500 कोटी ठेवी वर्गवारीतील मानाचा पुरस्कार: उपाध्यक्ष अ‍ॅड.राजेश्‍वर देशमुख यांनी स्विकारला गौरव

इमेज
  दीनदयाळ बँकेला 100 ते 500 कोटी ठेवी वर्गवारीतील  मानाचा पुरस्कार: उपाध्यक्ष अ‍ॅड.राजेश्‍वर देशमुख यांनी स्विकारला गौरव परळी वैजनाथ, प्रतिनिधी......     100 ते 500 कोटी ठेवी वर्गवारीतील  मानाचा समजला जाणारा पुरस्कार दीनदयाळ नागरी सहकारी बँकेला मिळाला आहे.महाबळेश्वर येथे आयोजित एका समारंभात दीनदयाळ बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.राजेश्‍वर देशमुख यांनी बँकेच्या वतीने हा गौरव स्विकारला.             बँको (नियतकालिक) प्रकाशनाकडून प्रतिवर्षी पुरस्कार दिले जातात. बँकिंग क्षेत्रात हा पुरस्कार मानाचा समजला जातो. यावर्षीचा ₹100 ते ₹500 कोटी ठेवी वर्गवारीतील मानाचा पुरस्कार दीनदयाळ नागरी सहकारी बँकेला मिळाला आहे.   महाबळेश्वर येथे एका समारंभात बँकेच्या वतीने  उपाध्यक्ष- अँड. राजेश्वरजी देशमुख यांनी पुरस्कार स्विकारला. यावेळी  ज्योतींद्रभाई मेहता, (राष्ट्रीय संरक्षक, सहकार भारती)  अविनाशजी शिंत्रे (मुख्य संपादक ,बँको प्रकाशन, कोल्हापूर.) यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दीनदयाळ नागरी सहकारी बँकेला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

MB NEWS:प्रतिकस् मेकअप स्टुडिओचे पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते शानदार उदघाटन

इमेज
  प्रतिकस् मेकअप स्टुडिओचे पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते शानदार उदघाटन  सौंदर्य क्षेत्रात प्रतिक सुरवसेचा नावलौकिक होऊन प्रतिकस् मेकअपचा (PM) ब्रॅण्ड राज्यात नाव करील - पंकजाताई मुंडे  नविन व्यवसायाला सर्वस्तरावरातुन नागरीकांच्या भरभरून शुभेच्छा  परळी वैजनाथ         सौंदर्य क्षेत्रात पुरूषांनी पुढाकार घेऊन काम करणे हे कौतुकास्पद आहे आणि प्रतिक सुरवसे याच क्षेत्रात नावलौकिक मिळवण्याचे स्वप्न घेऊन काम करणार असल्याने त्याला उज्ज्वल भविष्य आहे. त्याचा प्रतिकस् मेकअप (PM)  हा ब्रॅण्ड राज्यात नाव करील अशा शुभेच्छा देत प्रतिकस् मेकअप केवळ परळी शहरात न राहता त्याच्या राज्यात शाखा होतील असा विश्वास भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला. दरम्यान या नवीन व्यवसायाला शुभेच्छा देण्यासाठी सर्व स्तरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.          "प्रतिकस् मेकअप स्टुडिओचा उदघाटन समारंभ आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते थाटात संपन्न झाला. यावेळी पंकजाताई मुंडे यांनी मेकअप स्टुडिओची पाहणी करून सर्व माहिती घेतली. समसेट्टी निवास, प्रेमपन्ना नगर, आयसीआयसीआय बँकेच्

MB NEWS:आंतरराष्ट्रीय पखवाज वादक उद्धवबापू आपेगावकर, कवी इंद्रजित भालेराव यांच्या उपस्थितीत शेतकरी कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन

इमेज
 ●आंतरराष्ट्रीय पखवाज वादक उद्धवबापू आपेगावकर, कवी इंद्रजित भालेराव यांच्या उपस्थितीत  शेतकरी कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन परळी / प्रतिनिधी चौदा गावातील शेतकरी, कष्टक-यांनी एकत्र येऊन जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या बीजेनिमित्त आयोलेल्या कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, दि. 3 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता, कान्नापूर बस स्टॅण्ड जवळील भव्य मैदानात संपन्न होणार असून या शेतकरी कीर्तन महोत्सव उदघाटन प्रसंगी शेतक-यांच्या व्यथा-वेदना मांडणारे प्रसिद्ध कवी, संत साहित्याचे अभ्यासक इंद्रजित भालेराव आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पखवाज वादक उद्धवबापू आपेगावकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. शेतक-यांना न मागता कर्जमुक्ती देणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या बीजेनिमित्त होत असलेल्या कीर्तन महोत्सवासाठी चौदा गावातील शेतक-यांनी घेतलेला पुढकार एक आदर्श निर्माण करणारा आहे. अशा महोत्सवासाठी आयुष्याभर शेतक-यांच्या व्यथा-वेदना मांडणारे प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव येत आहेत, ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. वारकरी कीर्तन परंपरेचा अविभाज्य भाग असणा-या पखवाज या  वाद्याला अंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून देणारे उद्धवबापू आप

MB NEWS:आभा गणेश मुंडेने पहिल्या राज्यस्तरीय दिव्यांग योगासन स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक

इमेज
  आभा गणेश मुंडेने पहिल्या राज्यस्तरीय दिव्यांग योगासन स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक परळी वैजनाथ (प्रतिनिधी) महाराष्ट्र योगासन क्रीडा संघटना व बृहन महाराष्ट्र योग परिषदेने पुणे येथे २५ फेब्रुवारी रोजी पहिली राज्यस्तरीय दिव्यांग योगासन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत परळी वैजनाथ तालुक्यातील डाबी गावची कन्या कु. आभा गणेश मुंडेने सुवर्णपदक मिळवून अस्थिव्यंग प्रवर्गातील २० वर्षांपेक्षा लहान गटात पहिला क्रमांक पटकावला. हा पुरस्कार दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश देशमुख, तसेच सकाळ माध्यम समूहाचे प्रमुख प्रतापराव पवार तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आभा व इतर विजेत्यांना प्रदान करण्यात आला. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे लहानपणापासून आभास तिचे काका शरद मुंडे यांनी कोणत्या स्पर्धेसाठी योगासने शिकविले नाही तर तिच्या शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक विकासासाठी तिच्यावर योगसंस्कार केलेत. या स्पर्धेत यश मिळवून आभासह बीड जिल्ह्यातील यश नीलकंठ कापसे, कोमल दिगंबर लाड, संध्या आबासाहेब ढेम्बरे, रितुजा उमेश डिघुळे यांची मध्यप्रदेशमधील चित्रकूट येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. येथील विद

MB NEWS: आजारी असूनही पंकजाताई मुंडे नियोजित कार्यक्रमासाठी परळीत दाखल

इमेज
  समोरच्या व्यक्तीचा मान रहावा आपल्या न जाण्याने त्यांचे चारचौघात हसू होऊ नये म्हणून कार्यक्रम करणे क्रमप्राप्त -पंकजाताई मुंडे आजारी असूनही पंकजाताई मुंडे नियोजित कार्यक्रमासाठी परळीत दाखल आल्या आल्या लगेच  त्यांनी घेतला  जनता दरबार परळी वैजनाथ, प्रतिनिधी......        भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आजारी असूनही आज नियोजित कार्यक्रमांसाठी शहरात दाखल झाल्या. आल्या आल्या लगेच  त्यांनी जनता दरबार घेऊन सर्व सामान्य जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेत जागेवरच समस्या मार्गी लावल्या. दरम्यान याबाबतचे ट्विट त्यांनी काही वेळापुर्वीच केले होते.यामध्ये समोरच्या व्यक्तीचा मान रहावा आपल्या न जाण्याने त्यांचे चारचौघात हसू होऊ नये म्हणून कार्यक्रम करणे क्रमप्राप्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे.     पंकजाताई मुंडे यांना दोन तीन दिवसापूर्वी फुड पाॅयजनिंग झाले होते, इन्फेक्शन मुळे त्यांना अधिकच त्रास होऊ लागला. त्यातच मतदारसंघात नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणे देखील तितकेच महत्वाचे होते. त्यामुळे आजारी असूनही दुपारी त्या परळीत दाखल झाल्या. आल्या आल्या त्यांनी लगेच निवासस्थानी जनता दरबार सुरू केला. त्य

MB NEWS:कै.ल.दे.महिला महाविद्यालयात 'रोजगार मेळावा '

इमेज
  पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे नोकरी उपलब्ध करून देण्याचा महाविद्यालयाचा स्तुत्य प्रयत्न - श्री.योगेश उबाळे कै.ल.दे.महिला महाविद्यालयात 'रोजगार मेळावा ' परमस्कील छत्रपती संभाजीनगर व कै.ल.दे.महिला महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम परळी , दि. ०२ मार्च २०२३     येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय व परमस्कील छत्रपती संभाजीनगर  यांच्या संयुक्त विद्यमाने आज कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी 10:30 वाजता रोजगार मेळाव्याचे ( campus interview and selection ) आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी बोलत असताना परम स्किल प्रा.लिमिटेड कंपनीचे श्री योगेश उबाळे यांनी महाविद्यालयाने राबवलेल्या या उपक्रमाबद्दल बोलताना , "पुणे व छत्रपती संभाजीनगर येथे विद्यार्थ्यांकरिता नोकरीची संधी हे महाविद्यालय उपलब्ध करून देत आहे. निश्चितच त्यांचा हा प्रयत्न स्तुत्य स्वरूपाचा असल्याचे " उद्‌गार त्यांनी यावेळी काढले. "महाविद्यालय यापुढेही विद्यार्थ्यांच्या स्वावलंबनाकरिता सातत्याने प्रयत्नशील राहील ." अशी भूमिका यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोगतातून संजयजी देशमु

MB NEWS:रामदास आठवलेंच्या पक्षाला नागालँडमध्ये यश : दोन जागांवर विजय

इमेज
  रामदास आठवलेंच्या पक्षाला नागालँडमध्ये यश : दोन जागांवर विजय     नागालँड विधानसभा निवडणूक छोट्या पक्षांनीही आपलं अस्तित्व दाखवून दिले आहे. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने नागालँड विधानसभा निवडणुकीत दोन जागा जिंकल्या आहेत.    नागालँड विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप२, नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) युती आणि नागा पीपल्स फ्रंट यांच्या महत्त्वाची लढत असली तरी अनेक पक्षांनी यश मिळवले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, भाजप- एनडीपीपी युतीने 32 जागांवर आघाडी घेतली असून, 60 पैकी 2 जागा जिंकल्या आहेत. नागालँडमध्ये युती सरकार सत्तेत येण्याचे चित्र दिसत आहे. NDPP 1 जागा जिंकून 25 जागांवर आघाडीवर आहे, भाजपने 2 जागा जिंकल्या आहेत आणि 12 जागांवर आघाडीवर आहे आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) 3 जागांवर आघाडीवर आहे. भाजपा-एनडीपीला पुन्हा बहुमत ? २०२३ च्या नागालँड विधानसभा निवडणुकीत भाजपा-एनडीपीपी युतीची वाटचाल बहुमताकडे सुरु झाली आहे. नागालँडचे सध्याचे मुख्यमंत्री नेफिओ रिओ यांनी नॉर्थन अंगामी मतदारसंघातून निवडणू

MB NEWS:धनंजय मुंडेंची विधानसभेत मागणी

इमेज
  12 हजार शेतकऱ्यांचे बँकखाते गोठवले:सर्व शेतकऱ्यांचे सीबील बिघडणार नाही याची काळजी घेऊन बँकखाते पूर्ववत करून द्या !  धनंजय मुंडेंची विधानसभेत मागणी मुंबई (दि. 02) - बीड जिल्ह्यातील बारा हजार शेतकऱ्यांचे बँक खाते बजाज आलियांज या विमा कंपनीने चुकीचा पीक विमा जमा झाल्याचे कारण देत गोठवले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मानसिक त्रास झाला तसेच त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या सिबिलवरही झाला. अशा प्रकारे शेतकऱ्यांचे बँक खाते बँकेला कळवून गोठवणे हे बेकायदेशीर असून संबंधित कंपनीवर शासनाने गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी विधानसभेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून केली आहे. खरीप हंगाम 2022 मधील विमा धारक शेतकऱ्यांपैकी सुमारे 12 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 12 कोटी रुपये रक्कम बजाज अलियांज विमा कंपनीने जमा केले होते. मुळात शेतकऱ्यांना पात्र असूनही विमा मिळत नाही आणि त्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले तर एवढा मोठा व्यवहार करणारी विमा कंपनी जेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यावर चुकून पैसे आल्याचे सांगते हे अत्यंत अव्यवहार्य आहे असेही धनंजय म

MB NEWS:पंकजाताई मुंडेंनी केलं शेतकरी कन्येचं अभिनंदन

इमेज
  एमपीएससी परीक्षेतील  सोनाली मात्रेचे यश बीड जिल्हयासाठी  अभिमानास्पद पंकजाताई मुंडेंनी केलं शेतकरी कन्येचं अभिनंदन बीड । दिनांक ०१। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दैदीप्यमान यश मिळविणाऱ्या माजलगांवच्या सोनाली मात्रे हिच भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी अभिनंदन केलं आहे. सोनालीचं यश हे जिल्हयासाठी अभिमानास्पद आणि मान उंचावणारं आहे अशा शब्दांत त्यांनी तिचं कौतुक केलं आहे.   यासंदर्भात पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करून सोनालीच्या यशाचं कौतुक केलं आहे.राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत माजलगाव ता. इरला मजला येथील शेतकरी श्री. अर्जुन मात्रे यांची कन्या कु.सोनाली मात्रे ही महिलांमधून राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत तिने मिळविलेले हे यश नक्कीच अभिमानास्पद आहे असं त्यांनी म्हटलं आहे. ••••

MB NEWS:फाउंडेशन स्कूल येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

इमेज
  फाउंडेशन स्कूल येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा   आज दिनांक 27 2 2013 रोजी जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्त शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले. यामध्ये भित्तिपत्रकाचे अनावरण प्राचार्य श्री नरहारे सर श्री नागझरे सर व रेझोनन्स सेंटर हेड श्री संदीप यादव सर यांच्या हस्ते करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मराठी विषयाच्या विभागातर्फे ग्रंथ दिंडी आयोजित करून कार्यक्रमाचे वातावरण मराठीमय करण्यात आले व श्री जाधव सर यांनी गायलेले 'गरजा महाराष्ट्र माझा' या गीताने विद्यार्थ्यांमध्ये नवचेतना निर्माण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संहिता जोगदंड व स्नेहल जाधव या विद्यार्थिनींनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ कुलकर्णी मॅडम व श्री गुट्टे सर यांनी विशेष प्रयत्न केले तर कार्यक्रमाची सांगता श्रीमती रेड्डी मॅडम यांच्या आभार प्रदर्शनाने करण्यात आली.