MB NEWS:सरस्वती नदीशेजारील रस्त्यावरील ढाप्याचे काम करा-सुशील हरंगुळे

 सरस्वती नदीशेजारील रस्त्यावरील ढाप्याचे काम करा-सुशील हरंगुळे



परळी वैजनाथ

अंबेवेस भागातील सरस्वती नदीशेजारील रास्तवरील ढाप्याचे काम करण्यासाठी मागील 4 दिवसांपासून खोदून ठेवल्यामुळे नागरिकांना अडचण निर्माण झाली आहे. हा ढापा त्वरित तयार करून रस्ता पूर्ववत न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा भाजपा युवक नेते सुशील हरंगुळे यांनी दिला आहे.

मिलिंद विद्यालयासमोरून अंबेवेस कडे येणारा रस्ता हा मोठ्या प्रमाणात रहदारीचा आहे. वैद्यनाथ मंदिर, नेहरू चौक, मोंढ्याकडे जाण्यासाठी या रस्त्याचा प्रामुख्याने उपयोग होतो. भाजी मंडई या रोड वर असल्याने अनेक शेतकरी या रस्त्याचा उपयोग करतात. दहावी बारावीच्या परीक्षा चालू असल्याने विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण झाली आहे हा रस्ता तीन वेळा केला गेला व बिले उचलली गेली. परंतु केलेल्या बोगस कामांमुळे दोन वेळा केलेला ढापा पडला आहे. मागील चार दिवसांपासून पुन्हा ढाप्याचे काम करण्यासाठी तिसऱ्या वेळेस रस्ता खोदून ठेवला आहे. 

या ढाप्याचे काम त्वरित पूर्ण करून रस्ता पूर्ववत चाली करावा अन्यथा नगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपा युवक नेते सुशील हरंगुळे यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!