इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS: आजारी असूनही पंकजाताई मुंडे नियोजित कार्यक्रमासाठी परळीत दाखल

 समोरच्या व्यक्तीचा मान रहावा आपल्या न जाण्याने त्यांचे चारचौघात हसू होऊ नये म्हणून कार्यक्रम करणे क्रमप्राप्त -पंकजाताई मुंडे


आजारी असूनही पंकजाताई मुंडे नियोजित कार्यक्रमासाठी परळीत दाखल
आल्या आल्या लगेच  त्यांनी घेतला  जनता दरबार


परळी वैजनाथ, प्रतिनिधी......
       भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आजारी असूनही आज नियोजित कार्यक्रमांसाठी शहरात दाखल झाल्या. आल्या आल्या लगेच  त्यांनी जनता दरबार घेऊन सर्व सामान्य जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेत जागेवरच समस्या मार्गी लावल्या. दरम्यान याबाबतचे ट्विट त्यांनी काही वेळापुर्वीच केले होते.यामध्ये समोरच्या व्यक्तीचा मान रहावा आपल्या न जाण्याने त्यांचे चारचौघात हसू होऊ नये म्हणून कार्यक्रम करणे क्रमप्राप्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    पंकजाताई मुंडे यांना दोन तीन दिवसापूर्वी फुड पाॅयजनिंग झाले होते, इन्फेक्शन मुळे त्यांना अधिकच त्रास होऊ लागला. त्यातच मतदारसंघात नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणे देखील तितकेच महत्वाचे होते. त्यामुळे आजारी असूनही दुपारी त्या परळीत दाखल झाल्या. आल्या आल्या त्यांनी लगेच निवासस्थानी जनता दरबार सुरू केला. त्यांना भेटण्यासाठी आणि कामांसाठी मतदारसंघातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रत्येकांची गाऱ्हाणी ऐकून घेत त्यांनी जनतेच्या प्रश्नांचा जागेवरच निपटारा केला.
         दरम्यान, याबाबतचे ट्विट त्यांनी काही वेळापुर्वीच केले होते.यामध्ये समोरच्या व्यक्तीचा मान रहावा आपल्या न जाण्याने त्यांचे चारचौघात हसू होऊ नये म्हणून कार्यक्रम करणे क्रमप्राप्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

● असे आहे  पंकजाताईंचे ट्विट...
        इन्फेक्शन, प्रचंड अशक्तपणा पण कार्यक्रम करणे क्रमप्राप्त..यात कोणताही लाभ नाही समोरच्या व्यक्तीचा मान रहावा आपल्या न जाण्याने त्यांचे चारचौघात हसू होऊ नये इतकी प्रामाणिक भावना असते..सार्वजनिक जीवन हे व्रत आहे..या कष्टांचा मोल आशिर्वाद आहेच..





-------------------------------------------------------

Video news 







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या