नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली माहिती..

इमेज
नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट: 21 जूनला होणार परीक्षा नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने जाहीर केली आहे.या अपडेट नुसार आता नीट परीक्षा 21 जून रविवार रोजी घेण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या अधिकृत एक्स हॅण्डल वर दिली आहे. नीट परीक्षा 2026 तीन मे रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेपूर्वीच अनेक विद्यार्थ्यांच्या हाती या परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ही प्रश्नपत्रिका फुटली असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. त्यानुसार राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने ही परीक्षा रद्द केले असल्याची घोषणा केली. देशातील 23 लाख हून अधिक विद्यार्थ्यांनी नीट 2026 ची परीक्षा दिली होती. आता अचानक ही परीक्षा रद्द झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा मनस्ताप झाला. या परीक्षे संदर्भातील तपास नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सीबीआय कडे दिला. सीबीआयच्या तपासामध्ये राजस्थान मधील सिकर जिल्ह्यात त्याचबरोबर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, लातूर अणि पुणे या ठिकाणाहून या परीक्षेची संबंधित संशयितांना सीबीआयने अटक केली. त्यानंतर आज नॅशनल टीसी टेस्टिंग एजन्सीने 21 जून...

MB NEWS:आंतरराष्ट्रीय पखवाज वादक उद्धवबापू आपेगावकर, कवी इंद्रजित भालेराव यांच्या उपस्थितीत शेतकरी कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन

 ●आंतरराष्ट्रीय पखवाज वादक उद्धवबापू आपेगावकर, कवी इंद्रजित भालेराव यांच्या उपस्थितीत शेतकरी कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन





परळी / प्रतिनिधी


चौदा गावातील शेतकरी, कष्टक-यांनी एकत्र येऊन जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या बीजेनिमित्त आयोलेल्या कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, दि. 3 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता, कान्नापूर बस स्टॅण्ड जवळील भव्य मैदानात संपन्न होणार असून या शेतकरी कीर्तन महोत्सव उदघाटन प्रसंगी शेतक-यांच्या व्यथा-वेदना मांडणारे प्रसिद्ध कवी, संत साहित्याचे अभ्यासक इंद्रजित भालेराव आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पखवाज वादक उद्धवबापू आपेगावकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.


शेतक-यांना न मागता कर्जमुक्ती देणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या बीजेनिमित्त होत असलेल्या कीर्तन महोत्सवासाठी चौदा गावातील शेतक-यांनी घेतलेला पुढकार एक आदर्श निर्माण करणारा आहे. अशा महोत्सवासाठी आयुष्याभर शेतक-यांच्या व्यथा-वेदना मांडणारे प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव येत आहेत, ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. वारकरी कीर्तन परंपरेचा अविभाज्य भाग असणा-या पखवाज या  वाद्याला अंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून देणारे उद्धवबापू आपेगावकर यांची उपस्थिती या महोत्सवाची उंची वाढविणारी आहे. या सोहळ्याला पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समन्वयक अॅड. अजय बुरांडे यांनी केले आहे.

-------------------------------------------------------

Video news 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या