MB NEWS: अभिष्टचिंतन:परळीतील आजातशत्रू व्यक्तिमत्व तथा वृक्षमिञ गोविंद (भैया) चांडक....!

 परळीतील आजातशत्रू व्यक्तिमत्व तथा वृक्षमिञ गोविंद (भैया) चांडक....!

      पल्या प्रमाणिक मेहनतीच्या जोरावरती इच्छित यश प्राप्त करता येते मग क्षेत्र कुठलेही असो ते क्षेत्र सामाजिक असेल किंवा उद्योजकीय असेल मनापासून केलेल्या कृतीमुळे किंवा कार्यामुळे कोणत्याही क्षेत्रात प्राविण्य व नावलौकिक मिळवता येतो. निष्ठा, सातत्य, कष्ट करण्याची तयारी व आपल्या कामाप्रती प्रामाणिक हेतू जपत आपणही समाजाप्रती काही देणे लागतो या उदात्त भावनेतून आपल्या व्यवसायाच्या रहाटगाड्यातून वेळ काढत समाजासाठी शक्य होईल तेवढी मदत तथा कार्य करणारे व वृक्ष संगोपनासाठी अविरत कार्य करणारे वृक्षमित्र तथा परळी शहरामध्ये भैय्या या नावाने सर्व सुपरिचित तथा अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक कार्यकर्ते श्री गोविंद (भैया) चांडक हे होय.


    आज आपण जाणून घेणार आहोत परळीच्या मध्यवर्ती बाजारपेठेतील यशस्वी उद्योजक, मयुरी मल्टी सर्विस व झेरॉक्सचे संचालक तथा प्रमाणिक व सर्वसुपरिचित व्यक्तिमत्व असणाऱ्या गोविंद(भैया) बालाप्रसाद चांडक यांच्या विषयी. परळी शहरातील नावाजलेल्या पद्मावती भागात राहणारे गोविंद भैया चांडक हे उच्चशिक्षित असून देखील त्यांनी नोकरीच्या मागे न लागता आपली वेगळी वाट चोखाळत कठोर परिश्रम घेत परळी परिसरात स्वतःच्या व्यापार कौशल्याच्या जोरावर बाजारपेठेमध्ये व्यवसाय विश्वात आपले एक वेगलेच स्थान निर्माण केले आहे. भैय्यांचे शिक्षण पाहायला गेले तर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग आहे. काही अपवाद वगळता उच्चशिक्षित असणारे लोक हवेतच असतात परंतु गोविंद भैया चांडक हे त्याला अपवाद ठरतात. त्यांच्या ठायी उच्चविद्या विभूषित असल्याचा कुठलाही अविर्भाव जाणवत नाही. गोविंद भैया चांडक यांची अजुन एक दुखरी बाजू म्हणजे ते अपंग आहेत. आपल्या अपंगत्वाचा तथा शारीरिक व्यंगाचा कुठलाही बाऊ न करता किंवा कुठल्याही मदतीच्या कुबड्या न घेता स्वबळावर व स्वहिमतीवर त्यांनी आपले एक वेगळे विश्व तथा मित्र परिवार निर्माण केला आहे.


    गोविंद भैया चांडक यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान देखील भरीव तसेच इतरांना नोंद घ्यायला लावणारे आहे. त्यांचा येथील सामाजिक कार्यात हिरारीने सहभाग असतो. आपणही समाजाप्रती काही देणे लागतो या उदात्त भावनेतून त्यांचा परळी परिसरातील सामाजिक कार्यात नेहमीच वावर असतो. गेल्या काही काळामध्ये जगाने एका भयंकर वास्तवातून मार्गक्रमण केले तो काळ म्हणजे कोविडचा काळ होय या कोविडच्या काळामध्ये गोविंद भैया चांडक यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत स्वतःचा शक्य होईल तेवढा वेळ देऊन समाजकार्य केले असुन ते सदैव आपले सामाजिक दायित्व निभावण्यासाठी तत्पर असतात. ते स्वतः एक वृक्षमित्र असून इतरांनाही वृक्ष संगोपनासाठी प्रेरित करतात. परळी मध्ये वृक्ष संगोपनासाठी वृक्ष मित्रांची एक टीम सदैव  कार्यरत असते. परळी परिसरातील वृक्ष संगोपनासाठी कार्य करणाऱ्या तसेच परळीस ऑक्सिजन हब बनवण्यासाठी सक्रिय असणाऱ्या या गटामध्ये गोविंद भैया चांडक हे अग्रणी दूत म्हणून काम पाहतात असे म्हटले तर अतिशोक्तीचे नक्कीच ठरणार नाही. पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्ष जगवण्याच्या दृष्टीने वृक्ष चळवळीच्या माध्यमातून परळीतील या टीमने व या टीमचा भाग असणाऱ्या गोविंद भैय्या चांडक यांनी प्रसंगी स्वखर्चातून वृक्ष जगवण्यासाठी मेहनत घेतली आहे.  गोविंद भैया चांडक यांना माणसं जोडण्याचा देखील छंद असल्याकारणाने त्यांचा परळी शहरात तथा परिसरातील सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक व विविध क्षेत्रांमध्ये मित्रांचा एक मोठा गोतावळा आहे. मित्रांच्या मदतीसाठी देखील ते सदैव तत्पर असतात.


    कार्य हीच पूजा या उक्तीप्रमाणे आपल्या कामावर मनापासून निस्सीम प्रेम करणाऱ्या तथा निष्ठा असणाऱ्या, सदैव मित्रांच्या भाऊ गर्दीत वावरणाऱ्या, तालुक्याच्या सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमीच योगदान देणाऱ्या, वृक्ष चळवळीच्या माध्यमातून पर्यावरण समतोलाचा संदेश देणाऱ्या, प्रामाणिक कष्टाच्या जोरावर परळीच्या उद्योग विश्वात स्वतःच्या मयुरी ब्रँडचा विकास करणाऱ्या, प्रभू वैद्यनाथाचे निस्सिम भक्त असणाऱ्या, कुटुंबवत्सल, अजातशत्रू असणाऱ्या सुस्वभावी, व्यक्तिमत्वचा आज वाढदिवस. 

या वाढदिवसाच्या निमित्ताने गोविंद (भैया) चांडक यांच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होवो व नाथांचे नाथ प्रभू वैद्यनाथ त्यांना आरोग्यदायी आयुष्य प्रदान करो हीच प्रभुवैद्यनाथा चरणी मनोमन प्रार्थना.

✍️

श्रीराम लांडगे(पत्रकार)

परळी वैजनाथ,संपर्क क्रमांक : 9577821212

-------------------------------------------------------



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार