MB NEWS:दीनदयाळ बँकेला 100 ते 500 कोटी ठेवी वर्गवारीतील मानाचा पुरस्कार: उपाध्यक्ष अ‍ॅड.राजेश्‍वर देशमुख यांनी स्विकारला गौरव

 दीनदयाळ बँकेला 100 ते 500 कोटी ठेवी वर्गवारीतील  मानाचा पुरस्कार: उपाध्यक्ष अ‍ॅड.राजेश्‍वर देशमुख यांनी स्विकारला गौरव



परळी वैजनाथ, प्रतिनिधी......
    100 ते 500 कोटी ठेवी वर्गवारीतील  मानाचा समजला जाणारा पुरस्कार दीनदयाळ नागरी सहकारी बँकेला मिळाला आहे.महाबळेश्वर येथे आयोजित एका समारंभात दीनदयाळ बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.राजेश्‍वर देशमुख यांनी बँकेच्या वतीने हा गौरव स्विकारला.
            बँको (नियतकालिक) प्रकाशनाकडून प्रतिवर्षी पुरस्कार दिले जातात. बँकिंग क्षेत्रात हा पुरस्कार मानाचा समजला जातो. यावर्षीचा ₹100 ते ₹500 कोटी ठेवी वर्गवारीतील मानाचा पुरस्कार दीनदयाळ नागरी सहकारी बँकेला मिळाला आहे.  महाबळेश्वर येथे एका समारंभात बँकेच्या वतीने  उपाध्यक्ष- अँड. राजेश्वरजी देशमुख यांनी पुरस्कार स्विकारला. यावेळी ज्योतींद्रभाई मेहता, (राष्ट्रीय संरक्षक, सहकार भारती)  अविनाशजी शिंत्रे (मुख्य संपादक ,बँको प्रकाशन, कोल्हापूर.) यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.दीनदयाळ नागरी सहकारी बँकेला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !