MB NEWS:फाउंडेशन स्कूल येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

 फाउंडेशन स्कूल येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा


  आज दिनांक 27 2 2013 रोजी जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्त शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले. यामध्ये भित्तिपत्रकाचे अनावरण प्राचार्य श्री नरहारे सर श्री नागझरे सर व रेझोनन्स सेंटर हेड श्री संदीप यादव सर यांच्या हस्ते करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मराठी विषयाच्या विभागातर्फे ग्रंथ दिंडी आयोजित करून कार्यक्रमाचे वातावरण मराठीमय करण्यात आले व श्री जाधव सर यांनी गायलेले 'गरजा महाराष्ट्र माझा' या गीताने विद्यार्थ्यांमध्ये नवचेतना निर्माण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संहिता जोगदंड व स्नेहल जाधव या विद्यार्थिनींनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ कुलकर्णी मॅडम व श्री गुट्टे सर यांनी विशेष प्रयत्न केले तर कार्यक्रमाची सांगता श्रीमती रेड्डी मॅडम यांच्या आभार प्रदर्शनाने करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार