MB NEWS:केज-बीड रोडवर अपघातात माजी नगरसेवकाचा मृत्यू ; एक पोलीस कर्मचारी जखमी

 केज-बीड रोडवर अपघातात माजी नगरसेवकाचा  मृत्यू ; एक पोलीस कर्मचारी जखमी




केज :- केज-बीड रोडवर कोरेगाव जवळ अपघातात कार पलटी होऊन अपघात झाला. त्या अपघातात माजी नगरसेवक गजमफर उर्फ पप्पू (आण्णा) इनामदार यांचा मृत्यू झाला. तर पोलीस जमादार सय्यद चाँद हे जखमी झाले आहेत.


या बाबतची माहिती अशी की, दि २ मार्च रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास माजी नगरसेक तथा विद्यमान नगरसेविका इनामदार यांचे पती गजमफर उर्फ पप्पू अण्णा इनामदार आणि केज पोलिस ठाण्यातील पोलीस जमादार सय्यद चाँद हे दोघे स्विफ्ट डिझायर क्र (एम एच ०४/ ई एफ ७५५७) गाडीने बीडच्या दिशेने जात असताना केज-बीड रोडवर कोरेगाव जवळील तांदळे वस्ती जवळ समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना कार रस्त्याच्या खड्ड्यात जाऊन ती पलटी झाली. त्यात गजमफर उर्फ पप्पू आण्णा इनामदार यांच्या डोक्याला गंभीर मार लागला त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या सोबत असलेले पोलीस कर्मचारी सय्यद चाँद हे जखमी झाले असून जखमी पोलीस कर्मचारी सय्यद चाँद यांना बीड येथील दवाखान्यात दाखल केले आहे.


अपघाताची माहिती मिळताच केजचे नगरसेवक अझरोद्दीन इनामदार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पप्पू आण्णा इनामदार यांना खांद्यावर उचलून उपचारासाठी केज येथील दवाखान्यात घेऊन गेले. परंतु उपजिल्हा रुग्णालयात त्यांना घेऊन गेल्या नंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


पप्पू आण्णा इनामदार यांच्या अपघाताची आणि पाठोपाठ मृत्यूची माहिती होताच केज आणि परिसरातील नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली आणि अनेकांना अश्रू आवरणे कठीण झाले.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, सहाय्यक फौजदार राम यादव, संतोष गित्ते, हनुमंत गायकवाड यांनी उपजिल्हा रुग्णालय आणि अपघाताच्या ठिकाणी भेट दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !