MB NEWS:रामदास आठवलेंच्या पक्षाला नागालँडमध्ये यश : दोन जागांवर विजय

 रामदास आठवलेंच्या पक्षाला नागालँडमध्ये यश : दोन जागांवर विजय




    नागालँड विधानसभा निवडणूक छोट्या पक्षांनीही आपलं अस्तित्व दाखवून दिले आहे. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने नागालँड विधानसभा निवडणुकीत दोन जागा जिंकल्या आहेत.
  
नागालँड विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप२, नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) युती आणि नागा पीपल्स फ्रंट यांच्या महत्त्वाची लढत असली तरी अनेक पक्षांनी यश मिळवले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, भाजप- एनडीपीपी युतीने 32 जागांवर आघाडी घेतली असून, 60 पैकी 2 जागा जिंकल्या आहेत. नागालँडमध्ये युती सरकार सत्तेत येण्याचे चित्र दिसत आहे. NDPP 1 जागा जिंकून 25 जागांवर आघाडीवर आहे, भाजपने 2 जागा जिंकल्या आहेत आणि 12 जागांवर आघाडीवर आहे आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) 3 जागांवर आघाडीवर आहे.

भाजपा-एनडीपीला पुन्हा बहुमत ?

२०२३ च्या नागालँड विधानसभा निवडणुकीत भाजपा-एनडीपीपी युतीची वाटचाल बहुमताकडे सुरु झाली आहे. नागालँडचे सध्याचे मुख्यमंत्री नेफिओ रिओ यांनी नॉर्थन अंगामी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी रिओ हे चारवेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. ते आणखी एक टर्म मुख्यमंत्रीपदी राहण्याची शक्यता आहे.


निवडणुकीपूर्वीच NDPP BJP चा 40: 20 फॉर्म्युला

राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) आणि भाजप यांची निवडणूकपूर्व युती होती. त्यांनी 40:20 जागा वाटपाच्या आधारावर निवडणूक लढवली होती. नागा पीपल्स फ्रंट (NPF) ने 22 जागा लढवल्या आणि 2003 पर्यंत राज्यात सत्ता गाजवणाऱ्या आणि सध्याच्या सभागृहात एकही सदस्य नसलेल्या काँग्रेसने 23 जागांवर निवडणूक लढवली होती.

२०१८ च्या विधानसभेत NDPP-BJP युती

२०१८ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा सदस्य असलेल्या नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP ) पक्षाने १८ जागांवर विजय मिळवला. त्यानंतर या पक्षाने भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. नागा पीपल्स फ्रंटला २५ जागा जिंकून देखील सरकार स्थापन करता आले नाही. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !