MB NEWS:पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत कौडगाव हुडयाच्या सरपंच लताबाई रंजवे भाजपात

 पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत कौडगाव हुडयाच्या सरपंच लताबाई रंजवे भाजपात




_भाजपचा गमचा घालून केले पक्ष प्रवेशाचे स्वागत_


परळी वैजनाथ । दिनांक ०४।

कौडगाव हुडा येथील सरपंच लताबाई संभाजी रंजवे यांनी आज भाजपात प्रवेश केला. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी भाजपचा गमचा घालून त्यांच्या प्रवेशाचे स्वागत केले.


  नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत लताबाई रंजवे हया अपक्ष म्हणून उभ्या होत्या. ग्रामस्थांच्या विश्वासाच्या बळावर

त्या  सरपंच म्हणून निवडून आल्या. पंकजाताई मुंडे यांचे नेतृत्व मान्य करत गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण भाजपात प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, रमेशराव कराड, नितीन ढाकणे, पप्पू चव्हाण यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री दिलीप राठोड, कलावती पवार, कौसाबाई चव्हाण, बालासाहेब राठोड आदी उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!