MB NEWS:कै.ल.दे.महिला महाविद्यालयात 'रोजगार मेळावा '

 

पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे नोकरी उपलब्ध करून देण्याचा महाविद्यालयाचा स्तुत्य प्रयत्न - श्री.योगेश उबाळे


कै.ल.दे.महिला महाविद्यालयात 'रोजगार मेळावा '


परमस्कील छत्रपती संभाजीनगर व कै.ल.दे.महिला महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम


परळी , दि. ०२ मार्च २०२३

    येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय व परमस्कील छत्रपती संभाजीनगर

 यांच्या संयुक्त विद्यमाने आज कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी 10:30 वाजता रोजगार मेळाव्याचे ( campus interview and selection ) आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी बोलत असताना परम स्किल प्रा.लिमिटेड कंपनीचे श्री योगेश उबाळे यांनी महाविद्यालयाने राबवलेल्या या उपक्रमाबद्दल बोलताना , "पुणे व छत्रपती संभाजीनगर येथे विद्यार्थ्यांकरिता नोकरीची संधी हे महाविद्यालय उपलब्ध करून देत आहे. निश्चितच त्यांचा हा प्रयत्न स्तुत्य स्वरूपाचा असल्याचे " उद्‌गार त्यांनी यावेळी काढले. "महाविद्यालय यापुढेही विद्यार्थ्यांच्या स्वावलंबनाकरिता सातत्याने प्रयत्नशील राहील ." अशी भूमिका यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोगतातून संजयजी देशमुख यांनी मांडली.संस्थेचे सन्माननीय सचिव रवींद्र देशमुख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.प्राचार्य डॉ.एल. एस. मुंडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थिनींच्या विकासासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू " अशी भूमिका यावेळी विशद केली . उद्‌घाटन समारोहानंतर पदवी चालू असलेले ,पदवी ,आयटीआय या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात ए. के . इंजिनियरिंग , कारेगाव ; कल्याणी टेक्नोफोर्स लिमिटेड , धुत ट्रान्समिशन , इंडुरन्स टेक्नॉलॉजी लिमिटेड , पुणे व छत्रपती संभाजीनगर येथील कंपनीमध्ये विद्यार्थ्यांना  नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.या मुलाखतीसाठी परळी व परळी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्लेसमेंट सेलच्या प्रमुख कल्याणकर राजश्री , प्रा. डॉ. वर्षा मुंडे ,प्रा. डॉ. राजकुमार यल्लावाड , प्रा. शरद रोडे , प्रा. डॉ. विद्या देशपांडे ,प्रा रंजना शहाणे , प्रा.डॉ.राजकुमार जोशी , प्रा.डॉ.अरुण चव्हाण ,प्रा श्रीकृष्ण राठोड , प्रा. डॉ. संगीता कचरे , प्रा.डॉ. पाध्ये रागिनी , प्रा.डॉ.क्षितिजा देशपांडे , प्रा.डॉ.पूर्वा अर्धापुरे ,  प्रा.डॉ. प्रवीण दिग्रसकर , प्रा.डॉ.विलास देशपांडे  यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.राजकुमार यल्लावाड यांनी प्रास्ताविक प्रा.कल्याणकर राजश्री व आभारप्रकटन प्रा.डॉ.वर्षा मुंडे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार