MB NEWS:शेतकरी कीर्तन महोत्सव हे क्रांतिकारी पाऊल-शेतकरी कवी इंद्रजित भालेराव

 शेतकरी कीर्तन महोत्सव हे क्रांतिकारी पाऊल-शेतकरी कवी इंद्रजित भालेराव





परळी / प्रतिनिधी


शेतक-यांना न मागता कर्जमुक्ती देणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या बीजेनिमित्त कान्नापूर ता:धारुर जि. बीड या ठिकाणी दि.०३ मार्च ते दि. ०९ मार्च हे सात दिवस परिसरातील चौदा गावांनी मिळून शेतकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कीर्तन महोत्सवाची सुरवात०३ मार्च रोजी आयुष्याभर शेतक-यांच्या व्यथा-वेदना कवितेतून मांडणारे प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव, वारकरी कीर्तन परंपरेचा अविभाज्य भाग असणाऱ्या पखवाज या  वाद्याला अंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून देणारे उद्धवबापू आपेगावकर यांच्या उपस्थितीत झाली. या सोहळ्याला संबोधित करताना वरील उद्गार इंद्रजीत भालेराव यांनी काढले. 900 वर्षांपूर्वी ज्या उद्देशाने वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली तो उद्देश आता मात्र बाजूला राहून त्याची जागा दांभिकता, कर्मकांड आणि पाखंडाने घेतलेली आहे; म्हणून समाजातील जागरूक व्यक्तींनी पुढाकार घेऊन अशा कीर्तन महोत्सवाचे आयोजन करणे हा एक क्रांतिकारक उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. हे सांगतानाच त्यांनी संत नामदेवापासून, बसवेश्वर, चक्रधर ते संत तुकाराम पर्यंत सर्व संतांच्या वचनांचे प्रमाण देऊन आपल्या कर्तव्याला प्राथमिकता देणे हा विचार किती महत्त्वाचा हे लक्षात आणून दिले. सध्याच्या पोटभरू परमार्थाबद्दल उद्धव बापू आपेगावकर यांनी शेलक्या शब्दात परखड प्रहार केले. त्याचवेळी शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाचा शेतकऱ्यांनीच मोल भाव करू नये तो योग्य किमतीत खरेदी करावा जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या कामाचं योग्य मोल मिळेल असा विचार एबीपी माझा चे बीड जिल्हा प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी मांडला या कार्यक्रमाची प्रास्ताविक ह भ प श्यामसुंदर महाराज सौन्नर यांनी केले. 14 गावच्या संयोजन समितीने पुढाकार घेऊन हा कीर्तन महोत्सव सुरू केलेला आहे त्यावेळी पंचक्रोशीतील बहुसंख्य नागरिक व महिला उपस्थित होत्या. नऊ मार्च पर्यंत हा कीर्तन महोत्सव चालणार असून असेच उद्बोधक कार्यक्रम कीर्तन सुरू राहणार आहेत. याचा परिसरातील शेतकऱ्यांनी, आबालवृद्ध महीला,तरुण नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुल लाभ घ्यावा अशी आव्हान समन्वय समितीच्या ॲड अजय बुरांडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !