संतापजनक घटना

इमेज
  साडेतीन वर्षाच्या बालिकेवर ६५ वर्षीय वृद्धाचा अत्याचाराचा प्रयत्न केज तालुक्यातील काळेगाव (घाट) येथे एका ६५ वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला घरात कोंडून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. ही घटना १२ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. पीडित मुलीची आई कामावर गेलेली असताना, संशयित आरोपीने चिमुरडीच्या पाच वर्षांच्या भावाला खाऊचे आमिष दाखवून दुकानात पाठवले आणि त्यानंतर मुलीला आपल्या घरात बोलावून दरवाजा आतून बंद केला. काही वेळाने मुलगा दुकानातून परत आल्यावर बहीण न दिसल्याने त्याने घरात असलेल्या आजारी वडिलांना याची माहिती दिली. वडिलांनी शोध घेतला असता शेजाऱ्याचे घर बंद असल्याचे पाहून त्यांना संशय आला. आवाज देऊन घर उघडले असता संशयित आरोपी आणि मुलगी घरात मिळून आले. यावेळी नराधमाने मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने केज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोल...

MB NEWS:घृणास्पद घटना :सहा वर्षाच्या चिमुकलीवर ६० वर्षाच्या वृद्धाने केला अत्याचार

घृणास्पद घटना :सहा वर्षाच्या चिमुकलीवर ६० वर्षाच्या वृद्धाने केला अत्याचार


अंबाजोगाई - तालुक्यातील एका सहा वर्षीय बालिकेला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून ६० वर्षीय वृद्धाने अत्याचार केल्याची निंदनीय घटना समोर आली आहे. याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्या वृद्धाला पोलिसांनी तातडीने बेड्या ठोकल्या आहेत.


पिडीत अल्पवयीन बालिका सध्या अंबाजोगाई येथील एका शाळेत पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि.०२) शाळेतून घरी आल्यानंतर ती खेळण्यासाठी गेली. त्यानंतर रात्री ती कोणासही काहीही न बोलता एकटीच शांत बसली. त्यामुळे आई-वडिलांनी तिला विचारले असता पोट दुखत असल्याचे तिने सांगितले. दुसऱ्या दिवशी शाळेतून आल्यानंतरही तिचे पोट दुखत होते. त्यामुळे वडिलांनी तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने सांगितले की, गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ती मैत्रिणीसोबत खेळत असताना विष्णू बाबुराव सादुळे (वय ६०) हा तिथे आला. चल तुला चॉकलेट देतो असे आमिष दाखवून तो तिला जुन्या घरात घेऊन गेला. तिथे नराधम विष्णूने त्या सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला आणि कोणाला काही सांगितल्यास मारून टाकीन अशी धमकी दिली. सुरुवातीस इभ्रतीच्या भीतीने चिमुकलीच्या मातापित्यांनी कोणालाच काही सांगितले नाही. मात्र, ग्रामस्थांनी धीर दिल्यानंतर त्यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सदर तक्रारीवरून विष्णू सादुळे याच्यावर पोक्सोसह कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....