MB NEWS:आभा गणेश मुंडेने पहिल्या राज्यस्तरीय दिव्यांग योगासन स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक

 आभा गणेश मुंडेने पहिल्या राज्यस्तरीय दिव्यांग योगासन स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) महाराष्ट्र योगासन क्रीडा संघटना व बृहन महाराष्ट्र योग परिषदेने पुणे येथे २५ फेब्रुवारी रोजी पहिली राज्यस्तरीय दिव्यांग योगासन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत परळी वैजनाथ तालुक्यातील डाबी गावची कन्या कु. आभा गणेश मुंडेने सुवर्णपदक मिळवून अस्थिव्यंग प्रवर्गातील २० वर्षांपेक्षा लहान गटात पहिला क्रमांक पटकावला.


हा पुरस्कार दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश देशमुख, तसेच सकाळ माध्यम समूहाचे प्रमुख प्रतापराव पवार तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आभा व इतर विजेत्यांना प्रदान करण्यात आला.


उल्लेखनीय गोष्ट म्हणजे लहानपणापासून आभास तिचे काका शरद मुंडे यांनी कोणत्या स्पर्धेसाठी योगासने शिकविले नाही तर तिच्या शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक विकासासाठी तिच्यावर योगसंस्कार केलेत. या स्पर्धेत यश मिळवून आभासह बीड जिल्ह्यातील यश नीलकंठ कापसे, कोमल दिगंबर लाड, संध्या आबासाहेब ढेम्बरे, रितुजा उमेश डिघुळे यांची मध्यप्रदेशमधील चित्रकूट येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


येथील विद्यावर्धिनी विद्यालयात इयत्ता सहावीत शिकणाऱ्या आभाने प्राप्त केलेल्या यशामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




-------------------------------------------------------

Video news 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार