MB NEWS:पंकजाताई मुंडेंनी केलं शेतकरी कन्येचं अभिनंदन

 एमपीएससी परीक्षेतील  सोनाली मात्रेचे यश बीड जिल्हयासाठी  अभिमानास्पद




पंकजाताई मुंडेंनी केलं शेतकरी कन्येचं अभिनंदन


बीड । दिनांक ०१।

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दैदीप्यमान यश मिळविणाऱ्या माजलगांवच्या सोनाली मात्रे हिच भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी अभिनंदन केलं आहे. सोनालीचं यश हे जिल्हयासाठी अभिमानास्पद आणि मान उंचावणारं आहे अशा शब्दांत त्यांनी तिचं कौतुक केलं आहे.


  यासंदर्भात पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करून सोनालीच्या यशाचं कौतुक केलं आहे.राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत माजलगाव ता. इरला मजला येथील शेतकरी श्री. अर्जुन मात्रे यांची कन्या कु.सोनाली मात्रे ही महिलांमधून राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत तिने मिळविलेले हे यश नक्कीच अभिमानास्पद आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार