MB NEWS:प्रतिकस् मेकअप स्टुडिओचे पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते शानदार उदघाटन

 प्रतिकस् मेकअप स्टुडिओचे पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते शानदार उदघाटन 




सौंदर्य क्षेत्रात प्रतिक सुरवसेचा नावलौकिक होऊन प्रतिकस् मेकअपचा (PM) ब्रॅण्ड राज्यात नाव करील - पंकजाताई मुंडे 


नविन व्यवसायाला सर्वस्तरावरातुन नागरीकांच्या भरभरून शुभेच्छा 


परळी वैजनाथ 

       सौंदर्य क्षेत्रात पुरूषांनी पुढाकार घेऊन काम करणे हे कौतुकास्पद आहे आणि प्रतिक सुरवसे याच क्षेत्रात नावलौकिक मिळवण्याचे स्वप्न घेऊन काम करणार असल्याने त्याला उज्ज्वल भविष्य आहे. त्याचा प्रतिकस् मेकअप (PM)  हा ब्रॅण्ड राज्यात नाव करील अशा शुभेच्छा देत प्रतिकस् मेकअप केवळ परळी शहरात न राहता त्याच्या राज्यात शाखा होतील असा विश्वास भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला. दरम्यान या नवीन व्यवसायाला शुभेच्छा देण्यासाठी सर्व स्तरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 

        "प्रतिकस् मेकअप स्टुडिओचा उदघाटन समारंभ आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते थाटात संपन्न झाला. यावेळी पंकजाताई मुंडे यांनी मेकअप स्टुडिओची पाहणी करून सर्व माहिती घेतली. समसेट्टी निवास, प्रेमपन्ना नगर, आयसीआयसीआय बँकेच्या समोर झालेल्या या प्रतिकस् मेकअप स्टुडिओच्या उदघाटन सोहळ्याला सर्वच क्षेत्रातील महिला व पुरूषांची मोठी उपस्थिती होती. 

        पंकजाताई मुंडे पुढे म्हणाल्या की, सुंदर दिसणे जरी आपल्या हातात नसले तरी चांगले, टापटीप राहणे आपल्या हातात असते आणि त्यासाठी अशा स्टुडिओची आवश्यकता असते. वेगळ्या क्षेत्रात काम करण्याची तयारी प्रतिक ज्ञानोबा सुरवसे याने केली आणि याच क्षेत्रात नाव कमावण्याचे त्याचे स्वप्न आहे ही बाब कौतुकास्पद आहे असे सांगुन त्या म्हणाल्या की, प्रतिकस् मेकअप (PM) हा ब्रॅण्ड राज्यात नावलौकिक करेल असा विश्वास व्यक्त करून त्या म्हणाल्या की, सध्या सर्वांचाच चांगले दिसण्याकडे कल आहे. पुर्वी महिलाही ब्युटी पार्लरमध्ये जाण्याचे टाळत असत पण आता पुरूषही मोठ्या संख्येने सलुनमध्ये जाऊ लागले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात सौंदर्य क्षेत्रात काम करणाऱ्यांना आणखी संधी उपलब्ध होणार आहे आणि काही तरी करून दाखवण्याची इच्छा आहे त्यांनी यातच करीअर करावे असे आवाहन केले. 

      प्रतिक सुरवसे याचे स्वप्न आणि ध्येय मोठी आहेत, त्याला पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये संधी असतानाही त्याने आपल्या भागात व्यवसाय करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन केले. त्याची काम करण्याची इच्छा असल्याने त्याला या क्षेत्रात उज्ज्वल भविष्य आहे तो त्याच्या मेहनतीवर प्रतिकस् मेकअपचे (PM) नावलौकिक वाढविल असा विश्वास व्यक्त करून त्याच्या राज्यात चोहीकडे शाखा व्हाव्यात अशा शुभेच्छा दिल्या. 

     प्रतिकस् मेकअप स्टुडिओचे संचालक प्रतिक सुरवसे यांनी आभार व्यक्त करताना पुणे, मुंबई येथे संधी असतानाही आपल्या शिक्षणाचा आपल्या भागात उपयोग व्हावा म्हणून परळी वैजनाथ शहरात व्यवसाय सुरू करीत असल्याचे सांगून सहकार्य करण्याचे आवाहन केले. 

         प्रारंभी प्रतिकस् मेकअप स्टुडिओच्या वतीने ज्ञानोबा सुरवसे, सौ. प्रतिभा सुरवसे, चिफ. प्रतिक, चि. प्रणव सुरवसे, बाबुराव दहिभाते, प्रल्हाद बळवंत, गणेश बळवंत आदींनी पंकजाताई मुंडे यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन सौ. सुचिता पोखरकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रतिकस् मेकअपचे संचालक प्रतिक सुरवसे यांनी केले.

        कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, महिला, नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

-------------------------------------------------------

Video news 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार