MB NEWS:नांदेडचे लोन बीडपर्यंत राष्ट्रवादीचे आमदार केसीआर यांच्या भेटीला

 आ. प्रकाश सोळंके यांनी घेतली तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची भेट 



------

माजलगाव - मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी हैद्राबाद येथे तेलंगाणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची भेट शुक्रवारी भेट घेतल्याचे समोर आले आहे. या त्यांच्या भेटीमुळे राज्यात मोठी राजकीय खळबळ उडाली असून आ.सोळंके मागील काही महिन्यापासून के.सी.आर. यांच्या पक्षात जाण्याच्या सूचक वक्तव्याला दुजोरा मिळत आहे.


आमदार प्रकाश सोळंके हे मागील दोन तीन महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार अशा चर्चा होती. त्यातच एका पत्रकार परिषदेत ही त्यांनी मी भाजप, शिंदे गट किंवा तेलंगाणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या पक्षात जाऊ शकतो असे सांगितले होते. त्यातच शुक्रवारी आमदार सोळंके यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची हैद्राबाद येथे भेट घेतल्याचे समोर आले आहे. यामुळे आमदार प्रकाश सोळंके हे आत्ता के.सी.आर. यांच्या पक्षात जाणार का ? कधी प्रवेशाचा मुहूर्त काढणार या ना अनेक चर्चा होऊ लागल्या आहेत.


आमदार सोळंके यांची फेसबुक पोस्ट 


प्रकाश सोळंके यांनी त्यांच्या सोशल माध्यम फेसबुक वरून पोस्ट करत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची सदिच्छा भेट घेतली. शेतकऱ्यांविषयी असलेले धोरण आणि योजना, मुख्यमंत्री म्हणून तेलंगणा राज्यात विकासात्मक योजनांची आखणी करत देशभर आदर्शवत मुख्यमंत्री आज त्यांचे कौतुक होत आहे. त्यांची काम करण्याची पद्धत, शेतकरी,विद्यार्थी, कामगार,मजूर आणि इतर घटकांविषयी असलेली काम करण्याची महत्वकांक्षा यावर चर्चा केल्याचे सागितले जाते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !