MB NEWS:लाख बोलक्याहून थोर एकची कर्तबगार: ओमप्रकाश सारडा

 लाख बोलक्याहून थोर एकची कर्तबगार: ओमप्रकाश सारडा



परळी । प्रतिनिधी

परळी शहरातील गेल्या तीस वर्षांपासून राजकारणात असणारे ओमप्रकाश सारडा व महेश बँकेचे संचालक गेल्या 20 वर्षांपासून, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना रोटरी क्लबचे अध्यक्ष या पदावर राहून काम केल्याबद्दल 2001 वर्षात पुरस्कार मिळाला होता. तो पुरस्कार ओमप्रकाश सारडा यांना महाबळेश्वर येथे देण्यात आला. तसेच राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात रहात असताना राजकारणात सक्रीय राहून नगरसेवक, धार्मिक क्षेत्रात प.पू.प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा असो किंवा गिरीशबापू यांची शिवकथा तसेच या कथेमध्ये प्रामुख्याने भाग घेवून शेवटपर्यंत सात दिवस राहून येणार्‍या अडचणीवर मात करत सिंहाचा वाटा घेतल्याबद्दल ओमप्रकाश सारडा यांची निवड केल्याबद्दल  मराठवाडा साथीच्या वतीने पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारामुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. आज रविवारी माहेश्वरी समाज भुषण पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदीर येथे पुरस्कार देण्यात येणार आहे.

मारवाडी युवामंचद्वारे महाराष्ट्र प्रदेश बॉडीवर काम करून अखिल भारतीय मंडळात राहून कार्य केले. तसेच गेल्या दोन वर्षात कोरोना काळात सिनियर सिटीजनच्या माध्यमातून रुग्णांना भोजन व्यवस्था ठेवून सेवा केली. तसेच पाथरी तालुक्यातील गुंज, ढालेगाव येथे जनावरांचा कडबा जळाल्यानंतर शेतकर्‍यांकडून कडबा जमा करून तेथे पाठविण्यात आला. व यासाठी काही निधीही जमा केला. 

तसेच परळी शहरातील महाशिवरात्री यात्रा, महेश बँकेच्या वतीने महेश बँकेचे संचालक प्रा.टी.पी.मुंडे सर यांच्यासोबत राहून शाबुदाना, खिचडी भक्तांना वाटप केली. सांगली-सातारा येथील पूरग्रस्तांसाठीही मोठ्या प्रमाणात मदत पाठविली. महेश बँकेच्या माध्यमातून तसेच आपल्या मित्रमंडळीकडून जमा करून पूरग्रस्तांसाठी मदत पाठविली. परळी शहरात तसेच बीड जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी भागवत कथा, रामायण, सुंदरकांड वाचन अशा अनेक कथेमध्ये सक्रीय राहून सर्व समाजातील नागरिकांना घेवून वाचन करून घेत असत असे ओमप्रकाश सारडा यांना 25 ते 30 वर्षापासून राजकारण, समाजकारणात पुढाकार घेवून काम करत होते. त्यांच्या या कार्याबद्दल ओमप्रकाश सारडा यांना माहेश्वरी युवा संघटनेच्या वतीने आज नटराज रंगमंदीर येथे पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याबद्दल आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !