MB NEWS:अनावश्यक खर्च टाळून गोरगरीब रूग्णांसाठी मोफत आरोग्य शिबिरं घेणं केव्हाही चांगलं

 अनावश्यक खर्च टाळून गोरगरीब रूग्णांसाठी मोफत आरोग्य शिबिरं घेणं केव्हाही चांगलं

पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते  माजलगांवात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं  उदघाटन 


शिबिरातील रूग्णांना दिल्या सुदृढ आरोग्याच्या शुभेच्छा


माजलगांव ।दिनांक ०३।

आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या वातावरणात आरोग्याचा  विषय गंभीर बनला आहे. प्रत्येक जण आरोग्याविषयी जागृत झाला आहे. गोर गरीबांना महागडे उपचार घेणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते त्यामुळे अशा शिबीराचा त्यांना उपयोग होतो.  वाढदिवस, समारंभावर अनावश्यक खर्च टाळून अशी शिबीरं जास्तीत जास्त घेतली जावीत, त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा  असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी येथे केले.


डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील हाॅस्पीटल अहमदनगर आणि विजया अर्बन मल्टिस्टेट माजलगांव यांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे उदघाटन पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते  आज झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.  केले. माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, आर टी देशमुख, मोहनराव जगताप, रमेश आडसकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, अरूण बरकसे  प्रवक्ते राम कुलकर्णी, अरूण राऊत, नितीन नाईकनवरे, विजया अर्बनचे जयंत अकोलकर आदी यावेळी व्यासपीठावर होते.


    प्रारंभी पंकजाताईंच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन झाले. विजया अर्बनच्या वतीने त्यांचा याप्रसंगी ह्दय सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पुढे बोलताना त्या म्हणाल्या, आजकाल अनेक राजकीय लोक वाढदिवस किंवा अन्य कार्यक्रम घेऊन स्वतःवर जेसीबीने फुलं उधळून घेतात अशाने कुणी मोठा होत नसतो. जो जास्तीत जास्त गोरगरीबाची, वंचितांची सेवा करतो, तसे कार्यक्रम घेतो अशा संस्कारात आम्ही वाढलो आहोत.समाजासाठी काही तरी करावं यासाठी पुढं आलं पाहिजे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान योजनेंतर्गत मोफत उपचाराची मोठी सोय उपलब्ध करून दिली. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानमार्फत आम्ही देखील हजारो रूग्णांवर मोफत तपासणी उपचार व शस्त्रक्रिया केल्या. कुणाला आजार होऊ नये अशी  प्रार्थना करते, पण झाला तरी यातून ते सुखरूप बरे व्हावेत यासाठी हे शिबीर आहे, याचा रूग्णांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे पंकजाताई म्हणाल्या.


स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी

-----------

कार्यक्रमानंतर पंकजाताई मुंडे यांनी मोहनराव जगताप, रमेश आडसकर, नितीन नाईकनवरे, डाॅ. सरवदे यांच्या आग्रहावरून त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी पंकजाताईंचे वाजत गाजत उत्स्फूर्त स्वागत झाले. भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार