इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा परळीत तीव्र निषेध-वैजनाथ कळसकर

 मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा परळीत तीव्र निषेध-वैजनाथ कळसकर

परळी वैजना, मनसेच्या वतीने मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर आज दि. ०3 मार्च रोजी मुंबई दादर शिवाजी पार्क येथे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेले असतांना त्यांच्यावर अज्ञात ४ते ५ जणांनी हल्ला केला . या हल्ल्यात संदीप देशपांडे जबर जखमी झाले. या भ्याड हल्ल्याचा तिव्र निषेध करत परळी वैजनाथ येथे मनसेच्या वतीने निदर्षने करण्यात आली तसेच उपजिल्हाधीकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांसह, ग्रहमंत्री देवेंद्र फडणविस यांना निवेदन पाठवुन सदरील हल्ल्याची पुर्ण चौकशी करून हल्लेखोरांना तत्काळ अटक करून हल्ल्यामागील गुन्हेगारांवर कडक कायदेशीर कार्यवाही करावी, या ह्ल्ल्याचा मास्टरमाईंड शोधुन काढावा, संदीप देशपांडे यांना पोलीस संरक्षण सुरक्षा पुरवावी आदी मागण्या करण्यात आल्या या वेळी मनसेचे पदाधीकारी ता.अध्यक्ष श्रीकांत पाथरकर, शहरअध्यक्ष वैजनाथ कळसकर ता. उपाध्यक्ष विठ्ठल दादा झीलमेवाड श.उपाध्यक्ष प्रशांत कामाळे, ऋषिकेश बारगजे, मनविसे शहरअध्यक्ष हनुमान सातपुते, माणिक लटिंगे,अशोक सुरवसे,विजय बकरे आदींसह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणुन गेला .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!