दिव्यांगांसाठी आयुष्य खर्ची घालणार - डॉ. संतोष मुंडे
![इमेज](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgrpxLyLbPgpKo7p9ybl3-q89Z0ZY2kmdkjI80gAmXinxbvfqqFLJXLsmngwu1yS8P9p3GhF4kAYsmp_DF26OJ_8fWDxGUABy8TlCjEjl1CUbRjV28v0teKUtggaIKYgZb-7_MLu4KNrZ8vQ6WdqA8AGDuQaqS9lBmcuPfBdgfeW_-Go8fgfzL0_EnsyEI/s320/20231109_200106.jpg)
मुंबईच्या कार्यालयात उत्स्फूर्त स्वागत: डाॅ.संतोष मुंडे यांनी "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" अभियानाचे कामकाज घेतले समजुन मुंबईच्या कार्यालयात अनेकांनी केले स्वागत, दिव्यांगांसाठी आयुष्य खर्ची घालणार - डॉ. संतोष मुंडे मुंबई (प्रतिनिधी) दिव्यांगांच्या सेवेसाठी अभियानचे उपाध्यक्ष हे पद माझ्यासाठी खुप महत्वाचे आहे. पदाला न्याय देण्यासाठी मी वचनबद्ध असुन दिव्यांगांसाठी आयुष्य खर्ची घालणार असल्याचे प्रतिपादन "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" अभियानाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले. मुंबईच्या कार्यालयात अधिकारी, कर्मचारी व दिव्यांगांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. डॉ. संतोष मुंडे यांनी आज मुंबई येथे दिव्यांग स्वतंत्र मंत्रालय मित्तल टॉवर नरिमन पॉईंट येथे ऑफिसला भेट देऊन कामकाज समजून घेतले. यावेळी दिव्यांग विभागाचे प्रधान सचिव अभय महाजन, आयुक्त घोडके यांनी त्यांचे स्वागत करून कामकाजाचे स्वरूप व उद्दिष्टांबाबत सविस्तर माहिती दिली. सातत्याने ना. धनंजय मुंडेंच्या यांच्या नेतृत्वाखाली समाजातील दिव्यांग, निराधार,