बीड जिल्हाधिकारी यांचे आदेश

 बीड जिल्हयातील पाटबंधारे प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी  आरक्षीत : बीड जिल्हाधिकारी यांचे आदेश



बीड:प्रतिनिधी...

अल-निनोच्या प्रभवामुळे पर्जन्यमान कमी राहून, पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता तसेच सन २०२३ मध्ये पावसाळा सुरु होऊन जास्त कालावधी झाला तरी बीड जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांमधे समाधानकारक जलसाठा झालेला नसल्यामुळे व जलसंपत्तीचा अवैध उपसा हो नये तसेच जिल्ह्याचा अवर्षणाचा पूर्व इतिहास पाहता तसेच अल-निनो समुद्र प्रवाह सक्रियता यामुळे चालू वर्षी संभाव्यतः दुर्देवाने पर्जन्याने ओढ दिल्यास उपलब्ध पाणी साठा जास्तीत जास्त कालावधीसाठी पिण्यासाठी वापरता येईल. यासाठी जतन होणे आवश्यक असल्याने बीड जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी पुढील आदेशापर्यंत आरक्षीत करणे बाबतचे आदेश दि. १४/०८/२०२३ अन्वये निर्गमीत करण्यात आलेले आहेत.


       अल-निनो समुद्र प्रवाह सक्रियता यामुळे चालू वर्षी संभाव्य टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेवून या कार्यालयाकडील  पत्रान्वये बीड जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पामधुन अवैध पाणी उपसा रोखणेकरिता महसूल विभाग, संबंधित जलसंपदा विभाग, गटविकास अधिकारी कार्यालय व महावितरण विभागाचे अधिकारी / कर्मचारी यांची सर्व तहसिलदार यांनी सुयुंक्त पथके स्थापन करून अवैध पाणी उपस्यावर प्रतिबंध घालणेबाबत कळविण्यात आलेले आहे.


तसेच या कार्यालयाकडील दि. ३०/०६/२०२३, दि. २१.०८.२०२३ व दि. २९/०९/२०२३ रोजीचे पत्राव्दारे उपलब्ध पाणी साठा जास्तीत जास्त कालावधीसाठी पिण्यासाठी वापरात येण्याच्या दृष्टीने संदर्भीय आदेशाची काटेकोरपणेअंमलबजावणी करावी व धरणांमधील पाणीसाठ्याचा कोणत्याही परिस्थितीमध्ये अन्य कारणांसाठी उपसा होणार नाही व यामुळे पाणी टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घेणेबाबत आपणास अवगत करण्यात आलेले होते. करिता या वर्षामध्ये बीड जिल्ह्यात सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी झालेले असून घरांणामध्ये पाणीसाठा अत्यंत कमी

प्रमाणात शिल्लक आहे. त्यामुळे भविष्यात पर्जन्यमानाने ओढ दिल्यास बीड जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता संदर्भीय आदेशान्वये बीड जिल्ह्यातील सर्व धरणांमधील पाणी पिण्यासाठी आरक्षीत करण्यात आलेले असल्यामुळे, सदर जलसंपत्तीचा अवैध उपसा होवु नये, जिल्ह्याचा अवर्षणाचा पूर्व इतिहास पाहता उपलब्ध पाणी साठा जास्तीत जास्त कालावधीसाठी पिण्यासाठी वापरात येण्याच्या दृष्टीने संदर्भीय आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी व धरणांमधील पाणीसाठ्याचा कोणत्याही परिस्थितीमध्ये अन्य कारणांसाठी उपसा झाल्यामुळे पाणी टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असे आदेश बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी काढले आहेत. 







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !