इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

मराठा आरक्षण प्रश्नावरून जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतींचा बहिष्कार कायम;मतदान प्रक्रिया रद्द

 मराठा आरक्षण प्रश्नावरून जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतींचा बहिष्कार कायम;मतदान प्रक्रिया रद्द


बीड, एमबी न्युज वृत्तसेवा: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतींनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. या गावातून एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नव्हता, यामुळे या ठिकाणची मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे. आज जिल्ह्यातील 158 ग्रामपंचायत साठी मतदान होत असताना या 18 गावांमध्ये मात्र शुकशुकाट आहे. पाटोदा तालुक्यातील वैद्यकीय  येथे नऊ सदस्य व सरपंच पदासाठी निवडणूक होणार होती. परंतु ग्रामस्थांनी बैठक घेऊन या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत मराठा आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. आगामी काळातही ज्या निवडणुका होतील त्यामध्ये सहभाग होणार नसल्याचा ग्रामस्थांनी निर्धार केला आहे.










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या