श्री गणेश व मारुती मूर्तींची उत्साहात शोभायात्रा

 दि.१० रोजी बसस्थानक परिसरातील गणेश मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा



परळी वैजनाथ-(प्रतिनिधी)येथील बस स्थानकाच्या आवारातील श्री गणपती मंदिरातील श्री गणेश व मारुती मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन दि.८ ते १० नोव्हेंबर दरम्यान  करण्यात आले असून  उटीब्रह्मचारी येथील निळकंठेश्वर महादेव मंदिराचे मठाधीपती प.पू.श्री सुरेशजी ब्रह्मचारी महाराज यांच्या हस्ते दोन्ही मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व मंदिराचे कलशारोहण संपन्न होणार आहे.

         गणेश मंदिराच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून शुक्रवार दि.१० रोजी होणाऱ्या ह्या प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यास राज्याचे कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे व न.प.गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने बुधवारी सकाळी श्री गणपती मंदिरापासून मोंढा मार्केट, टावर, जिजामाता उद्यान, घरणीकर रोड , छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे परत मंदिरापर्यंत भव्य  शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने भाविक-भक्त सहभागी झाले होते. 

         प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहान आगारप्रमुख तसेच मंदिराचे संस्थापक कै.डी.एस.क्षिरसागर यांचे चिरंजीव संजय क्षिरसागर ,मंदिराचे पुजारी पांडुरंग जोशी व एसटी कर्मचारी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !