इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

अमेरिकेत असलेल्या वर्गमित्रांची उपस्थिती

 सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या वर्गमित्रचे स्नेह मिलन उत्साहात 




अमेरिकेत असलेल्या वर्गमित्रांची उपस्थिती


परळी/प्रतिनिधी

     परळी येथील श्री सरस्वती विद्यालयातील १९८१ बॅचच्या वर्गमित्राचे ४२ वर्षांनंतर झाले स्नेह मिलन. दोन दिवस निवासी झालेल्या कार्यक्रमात सगळ्या वर्गमित्रांणी सहकुटुंब सहभाग घेतला. मराठवाडा साथीचे संपादक व बंसल क्लासेस महाराष्ट्रचे मुख्य प्रवर्तक चंदुलाल बियाणी यांच्या संकल्पनेतून चौथ्यांदा स्नेहमिलन चा कार्यक्रम झाला. परभणीपासून जवळच असलेल्या कोकोनट रिसोर्टमध्ये दोन दिवस स्वतःची सर्व कामे सोडुन मुक्कामी राहुन एकमेकांच्या कुटुंबीयांची ओळख व माहीती जाणुन घेतली. दिनांक २८ व २९ नोव्हेंबर हे दोन दिवस श्री सरस्वती विद्यालयातील १९८१ बॅचच्या वर्गमित्रांची निवासी व्यवस्था करण्यात आली होती. बालपण एकत्र घालविलेले वर्गमित्र सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेले ४२ वर्षांनंतर एकत्र आल्या नंतर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. यावर्षी कोजागिरी पौर्णिमा सर्व वर्गमित्रांणी एकत्र येत साजरी केली. परळी येथील श्री सरस्वती विद्यालयातील १९८१ बॅचच्या वर्गमित्रांचे हे चौथे स्नेहमिलन झाले.

या स्नेहमिलनाचे वैशिष्ट्ये ठरले ते अमेरिकेत स्थायिक असलेले डॉ विनायक लोणीकर हे कुटुंबीयांसह आले होते. तसेच या स्नेहमिलनास छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, परळी वैजनाथ, सेलु, भोकर, पुणे, नाशिक, नांदेड, हैद्राबाद, कुलबुर्गी येथूनही वर्गमित्र सपत्नीक आले होते. दोन दिवसात स्वीमिंग, रेन डान्स, अंताक्षरी, उखाने, गाणे, हौजी गेम, कविता, अँकरद्वारे  गेम मध्ये सर्वांनी सहभाग घेतला. दोन दिवस चालेल्या कार्यक्रमानी कोकोनट रिसॉर्ट एक घर बनले होते.

यावेळी सर्वश्री चंदुलाल बियाणी, सतीश सारडा, किरण सारडा, दामजी पटेल, हरि मोदानी, अ‍ॅड.गोविंद घुगे, ज्योती देशमुख, ज्योती शर्मा, सुशीला बांगर यांनी मनोगत व्यक्त करून आठवणींना उजाळा दिला. सदरील स्नेह मिलनची संकल्पना चंदुलाल बियाणी यांनी केली होती.

या कार्यक्रमास राजेंद्र लोढा, संजय सोनी, नितीन घोडके, दामजी पटेल, सुनिल सुरवसे, हरी मोदाणी, संतोष वट्टमवार, अ‍ॅड.गोविंद घुगे, इंजि.ओम बजाज, शिवाजी ठोंबरे, राजेश मुंडे, अरूण शिंदे, गोकुळ चांडक, सुशिला बांगर, ज्योती देशमुख, पुष्पा बलदवा, संजीवनी गोजमगुंडे, सुनिता कुरा, गीता मनियार, सुनिता मंठेकर, मंदा शेटे, भागवतकन्या टवानी, ज्योती शर्मा, लता लव्हराळे, लता मालपानी, लता कोरे, विजया बलदवा, स्वरूपा येचन तसेच सोबत सर्व कुटूंब असे 51 जण उपस्थित होते.

स्नेहमिलन यशस्वी करण्यासाठी सतीश सारडा, शिला डागा, संजय मोदी, शेखर परदेशी, अशोक ठोंबरे यांनी परिश्रम केले.










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!