मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

दिपावलीच्या तोंडावरच अंबाजोगाईत दोघांची आत्महत्या

 दिपावलीच्या तोंडावरच अंबाजोगाईत दोघांची आत्महत्या




अंबाजोगाई - सर्वत्र दिपावलीची लगबग सुरू असताना अंबाजोगाई शहरातील स्वाराती रूग्णालय परिसरातील पीजीच्या मुलांच्या वसतिगृहांमध्ये लिपिकाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. तर शहर पोलिस ठाण्याच्या समोर असलेल्या व्यापारी संकुलामध्ये मित्राच्या मोबाईल शॉपी मध्ये गळफास घेवून आपली जिवनयात्रा संपविली. यात वैजनाथ अनंतराव काळे (वय 47) रा.कोळपिंपरी ता.सोनपेठ व शरद भागवत जैसवाल (वय 55) रा.गुरूवार पेठ अंबाजोगाई अशी दोघा मयतांची नावे आहेत.

दिपावलीचा सन तोंडावर आला असताना अंबाजोगाई शहरातील अशिया खंडात नावजलेले स्वामी रामानंद तीर्थ ग्रामिण वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय परिसरातील मुलांच्या वसतीगृहांमध्ये लिपीक पदावर असलेले वैजनाथ अनंतराव काळे, रा.कोळपिंपरी ता.सोनपेठ येथील हे कर्मचारी वसतिगृहामध्ये कामास होते. सकाळी नित्यनियमाप्रमाणे वसतिगृहावर सोबतच्या कर्मचार्‍याला गप्पा मारत कार्यालयीन कामकाजासाठी गेले. परंतु त्यांनी एका खोलीमध्ये जावून पंख्याच्या हुकाला गळफास घेत आत्महत्या केली. काळे हे बाहेर कसे येत नाहीत म्हणून कर्मचार्‍यांनी दरवाजा ठोठावला. आतुन कुठलाही प्रतिसाद न आल्यामुळे दरवाजा तोडून कर्मचार्‍यांनी आत गेले असता त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आहे. आत्महत्या कुठल्या कारणास्तव केली अद्यापही कळाले  नसले तरी पोलिस तपासाअंती आत्महत्येचे कारण समोर येणार आहे. दुसरी घटना शहराच्या पोलिस ठाण्यासमोर असलेल्या नगर पालिकेच्या व्यापारी संकुलामध्ये  पहिल्या मजल्यावर मोरया मोबाईल शॉपी असून या शॉपीमध्ये मोबाईलचा व्यवसाय चालतो. या दुकानामध्ये दुकान मालक शरद भागवत जैस्वाल रा.गुरूवार पेठ (वय 55) हे दोघे जण रात्री दहा वाजेपर्यंत दुकानात बसलेले होते. 10.30 ला दुकान बंद करून जैस्वाल घरी गेले असता घरच्यांनी घराचे दार न उघडल्यामुळे मित्राला आजच्या रात्र दुकानी झोपतो असे सांगितले. परंतु त्याने पहाटेच्या दरम्यान पंख्याला असणार्‍या हुकाला गळफास घेवून आत्महत्या केली. दुकान मालकाने सकाळी साडेदहा वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता शटर न उघडल्यामुळे त्याने कुलपाचा कोंडा तोडून उघडले असता आतमध्ये जयस्वाल हे पंख्याच्या हुकाला लटकलेले दिसून आले. यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत पंचनामा केला. आत्महत्या का केली. याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून पोलिस तपासाअंती समोर येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....