मनोज जरांगे पाटील यांचा तिसरा टप्पा: 15 नोव्हेंबरपासून राज्याचा सुरू होणार दौरा

 मनोज जरांगे पाटील यांचा तिसरा टप्पा: 15 नोव्हेंबर पासून राज्याचा सुरू होणार दौरा




औरंगाबाद,दि.9(प्रतिनिधी) मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करणारे मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबर 2023 पर्यंतची मुदत दिली आहे.सध्या जरांगे पाटील यांच्यावर  रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 दरम्यान, जरांगे पाटील पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पाटील यांनी आज हा दौरा जाहीर केला आहे. दौरा करून ते संवाद साधणार आहे. मराठा आरक्षणासाठी कार्यवाही सुरू झाली आहे. कुणबी प्रमाणपत्र वाटप केले जात आहे. मराठा समाजाला त्यांनी आवाहन केले आत्महत्या करु नका. शासनाला 24 डिसेंबरची डेडलाईन दिलेली आहे हा दिवस फार महत्त्वाचा आहे म्हणून आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलू नये अशी विनंती त्यांनी केली आहे. युवकांनी आत्महत्या केल्या असल्याने दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय जरांगे पाटील यांनी घेतला आहे. पाटील यांचा दौरा 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. यासंदर्भात जरांगे पाटील यांनी आज रुग्णालयात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

 यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, राज्यातील मराठा समाजाची भेट घेण्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरू करत आहोत. 15 नोव्हेंबर 2023 ते 23 नोव्हेंबर 2023 या कालावधीत तिसरा टप्पा सुरू होत आहे.तिसऱ्या टप्प्यात ते 15 नोव्हेंबरला वाशी, परंडा, करमाळा, 16 नोव्हेंबरला दौंड आणि मायणी, 17 नोव्हेंबरला सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, कराड, 18 नोव्हेंबरला सातारा, मेंढा, वाईस रायगड, 19 नोव्हेंबरला रायगड, रायगड दर्शन, रायगड ते पाचाड, महाड, मुळशी, आळंदी या ठिकाणी भेट देतील. 20 नोव्हेंबरला आळंदी, तुळापूर, खालापूर, कल्याण, 21 नोव्हेंबर रोजी ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर. 22 नोव्हेंबर रोजी विश्रांतगड, संगमनेर , श्रीरामपूर 23 नोव्हेंबर नेवासा, शेवगाव, भोदेगाव, अवमापूर, धोंडेगाव हा तिसऱ्या टप्प्याचा दौरा आहे. चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या टप्प्यात पुढील दौरा करणार असल्याचेही जरांगे पाटील यांनी सांगितले. 1 डिसेंबरपासून आम्ही प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू करणार आहोत. साखळी उपोषण सुरूच ठेवावे.
           हा महाराष्ट्र दौरा आम्ही स्वखर्चाने करणार आहोत.यापूर्वीची भेटही आम्ही स्वेच्छेने केली आहे, कोणी पैसे देऊ नये, असेही जरांगे पाटील म्हणाले. कुणी पैसे मागितल्यास त्याच्याकडून पैसे परत घ्या, असे पैसे कुणी घेताना आढळून आल्यास समाज त्याला माफ करणार नाही.आमचे आंदोलन कलंकित होऊ नये, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार